सावधान | ‘या’ जागी अज्ञात चोरट्याने केली मंदिराची लूट…

0

Mh13news Network

अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करत सोन्याच्या दागिन्यांसह दानपेटीतील रक्कम चोरून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास शेळगी येथील बनशंकरी नगरातील जगदंबा मंदिरात घडली. याप्रकरणी सूर्यकांत भीमाशंकर चारी (वय ५२, रा. बनशंकरी नगर, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,पहाटे २ मेच्या दरम्यान  कोणीतरी अज्ञात चोरट्याने बनशंकरी मंदिर व जगदंबा मंदिराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. चार हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे बनशंकरी देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, दानपेटीतील पाच हजार रुपये असा एकूण नऊ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली. या घटनेचा पुढील तपास पोसई दाईंगडे हे करीत आहेत.

दरम्यान शहरामध्ये चोरीच्या घटना वाढत असून, घरफोडीनंतर आता चोरटे मंदिरांनाही लक्ष्य करीत आहेत. याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here