सोलापूर | पहिल्यांदाच एकाच दिवशी 312 कोरोनामुक्त तर 96 नवे पॉझिटिव्ह, 4 जणाचा मृत्यू

0

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शनिवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 12 पर्यंत एकूण ११४७ वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी १०५१ अहवाल निगेटिव्ह आले असून ९६अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात ६० पुरुष तर ३६ महिलांचा समावेश होतो .आज ४५४ प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज प्रथमच तब्बल ३१२ बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.
Scan 25-Jul-2020

4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4401 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 342 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1261 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2798 इतकी समाधानकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here