बार्शी तालुक्यात आणखीन 3 कोरोना बाधित; ३ जण बरे…

0

MH13 NEWS NETWORK

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे.आज बुधवारी दुपारी दिलेल्या माहिती नुसार बार्शी तालुक्यात एकूण ३ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. अशी माहिती डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली आहे. आज जामगाव आ. येथील ३ जण कोरोना मुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे.

सोलापूर रोडवरील बगले बरड या परिसरातील दोन पुरुष तर पौळ गल्ली, वैराग येथील एक पुरुष बाधित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रुग्णालयात दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच आहे. यामध्ये बार्शी येथील कोविड सेंटरमध्ये दोन,जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे एक, तर पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये एक, आणि सुश्रुत हॉस्पिटल मध्ये एक, बाधित रुग्ण  उपचार घेत आहेत.

आजपर्यंत बार्शी तालुक्यात २४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. १ व्यक्ती मृत असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले १८ जन कोरोना मुक्त आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here