स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या झाली २९

0

(वेब/टीम)

शहरात स्वाईन फ्लूचा आजाराचा फैलाव जोमाने वाढत आहे. या रुग्णांच्या संख्येत आता झपाट्याने वाढ होत असून गुरुवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण रुग्णांच्या संख्येत सहा ने वाढ झाली असल्याचे दिसून आले. मात्र महापालिका आरोग्य यंत्रणा अद्यापही म्हणावी तशी गतिमान झाल्याचे दिसत नाही.

शहर परिसरात गुरुवारपर्यंत २९स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून , त्यापैकी अकरा रुग्ण उपचार घेऊन परतले असल्याचे सांगण्यात आले. महापालिका आरोग्य विभागाकडे एकूण २९स्वाईन फ्ल्यू संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून अश्विनी सहकारी रुग्णालयात ९ , मार्कंडेय रुग्णालयात ४ तर यशोधरा हॉस्पिटलमध्ये ३ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी दिली .
आजपर्यंत दोन स्वाईन फ्लू संसर्गित रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून झपाट्याने वाढणाऱ्या या आजारामुळे शहरवासियांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यातच डेंग्यूच्या आजाराने ही डोके वर काढले असून 170 डेंग्यूसदृश्य रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे.

आय डी एच रुग्णालय नावालाच
इन्फेक्शन डिसीज हॉस्पिटल (आयडीएच) हे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेले रुग्णालय नावालाच उरले आहे. शहरात स्वाईन फ्लू व डेंग्यूच्या आजाराने विळखा घातला असून दुसरीकडे या रुग्णालयात केवळ ९ बेडची व्यवस्था असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणेची व आरोग्य सुविधेची उपलब्ध इथे नाही. स्वाईन फ्लू साठी अत्यावश्यक असणारे व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध नसल्याने रुग्णालयाचा कोणताही उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here