पालकमंत्र्यांनी झेंडावंदन करू नये अन्यथा…

0

Mh13news Network

सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे ५ टीएमसी पाणी पळवणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री भरणे यांनी झेंडावंदन करू नये. अन्यथा १ मे रोजी उजनी धरणाच्या जलाशयात जलसमाधी घेऊन निषेध व्यक्त करणार आहे, असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला.

कुर्डू, ता. माढा येथे उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या आदेशाविरुद्ध जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत उजनी पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली भविष्यात दीर्घकालीन लढा लढण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान करण्यात आला.

उजनी धरणातील पाण्याचे १०० टक्के वाटप पूर्ण झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावरील अनेक पाणीपुरवठा योजना निधीअभावी रखडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत धरणात पाणी शिल्लक नसताना पाणी पळवून पालकमंत्री भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील जनतेचा विश्वासात केला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व करण्याचा त्यांना आता कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी 1 मे महाराष्ट्रदिनी सोलापूर शासकीय झेंडा फडकवू नये. अन्यथा आम्ही उजनी धरणामध्ये जल समाधी घेणार असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here