कोरोना | राज्य सरकारने काढली नवी नियमावली

0

Mh13news Network

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते.त्यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली होती.अशातच आता राज्य सरकारने पुन्हा मोठं पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेलं आहे अशाच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे.असं असलं तरी राजकीय सभांना आणि जाहीर कार्यक्रमांना मात्र परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना कोरोनाचे नियम पाळले नाहीत, अशा लोकांकडून घेण्यात आलेला दंड देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क घातला नसेल तर त्या व्यक्तीला ५०० रूपये दंड भरावा लागणार आहे.

रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये जर कोणी मास्क घातलेला नसेल तर प्रवाशाला ५०० रूपये दंड आणि चालकाला देखील ५०० रूपये दंड आकारण्यात येणार आहे.तर दुकानदारांना देखील मास्क घातला नसल्यावर ५०० रूपये दंड घेण्यात येईल.

मुंबईतील एस.टी., बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम आणि खुल्या मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी गंभीर इशारा दिला होता. डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here