जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन ; असे व्हा सहभागी

0

MH13NEWS Network

वनविभाग, सामाजिक वनीकरण, युगंधर फाऊंडेशन, मेतन फाऊंडेशन, रानवेध यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

5जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युनोने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार यावर्षी जास्तीत जास्त लोकसहभाग वाढण्यासाठी युवकांना घेऊन पर्यावरण जनजागृती व संवर्धन-संरक्षण उपक्रम घेण्यात येणार आहेत. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतर पाळून सुरक्षित घरात राहून पर्यावरणविषयक उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. निबंध स्पर्धा, ऑनलाइन व्हिडीओ स्पर्धा घेऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढवून जनजागृती करण्याचा मानस असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्याना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या समन्वयक म्हणून युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रा. रेश्मा माने आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थी, नागरिक, तरूणांनी स्पर्धेत सहभाग नोंदवविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेचे विषय- खुला गट
1 ) वृक्षवल्ली आम्हा सोयरे
2 ) पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज
3) कोरोना व पर्यावरणवर परीणाम
4 ) माळरान व पक्षीजगत

शालेय विद्यार्थी गट- 5वी ते 10वी
1) माझे घर माझी बाग
2) सोलापूर जिल्ह्यातील जैवविविधता
3) माझे आवडता प्राणी/पक्षी/झाड इ.
4) इको फ्रेडली सिटी ही माझी जबाबदारी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम
1)निबंध स्वहस्ताक्षरामध्ये लिहून इमेल/व्हाट्सएप करावे.
2)स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेवटची तारीख 10जून असेल.
3) शब्द मर्यादा 400 ते 500 शब्द शालेय गट, 1000 ते 1500 शब्द मर्यादा खुला गट.
4)कॉपी पेस्ट माहिती किंवा निबंध नसावेत. स्वानुभवावर जास्त भर असावा.
6) नाव, पत्ता, शाळेचे /कॉलेजचे नाव व संपर्क क्रमांक व्यवस्थित लिहावा.

एक मिनिट व्हिडीओ स्पर्धा –

आपल्या परिसरातील जैवविविधता, बाग, नैसर्गिक सौंदर्य, प्राणी/पक्षी यांचे एक मिनीटाचा व्हिडीओ बनवून त्याद्वारे त्यांची नोंद घेणे.

नियम- व्हिडीओ घेत असताना कॅमेरा/मोबाईलमध्ये बॅकग्राऊंडला कोणतेही इतर आवाज किंवा संगीत नसावे यांची काळजी घ्यावी.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना 12 जून 2021 पर्यंत आपले निबंध/ व्हिडीओ दिलेल्या फोनवर/इमेलवर पाठवावेत. संपर्क प्रा. रेश्मा माने (8788139229) यावर व्हॉट्सअप करणे आणि वनविभाग सोलापूर इमेल – forestdepartment5june2021@gmail.com यावर मेल करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here