शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या

0

Mh13news Network

संविधान दिनानिमित्त शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे आज मंत्रालयात वाचन केले. यावेळी मंत्री प्रा.गायकवाड यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

भारतीय संविधान हे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असे आहे. या संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अमूल्य असे योगदान दिले आहे, असेही मंत्री प्रा.गायकवाड यांनी यावेळी म्हटले.

यावेळी मुख्य सचिव श्री सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव इंद्रा मालो आणि सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी हे देखील उद्देशिकेच्या सामूहिक वाचनात सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here