MH13NEWS Network
शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये 32 जणांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यातील 25 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर अद्यापही सात जणांचे रिपोर्ट अप्राप्त आहे. सध्या सोलापुरात एकही कोरोना बाधित रुग्ण नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आतापर्यंत 254 जणांचा होमक्वारंटाइन करण्यात आला असून, यातील 110 जणांना चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 144 जणांना निगराणीखाली आहेत. या सर्वांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आला आहे तर आयसोलेशन वार्ड मध्ये 55 जण ऍडमिट असून कालावधी पूर्ण झालेल्याना घरी सोडण्यात आले असून, 28 जणाना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.