ऑपरेशन परिवर्तन | बेगमपुरातील हातभट्टीवर मारला छापा आणि..

0

ऑपरेशन परिवर्तन‘ अंतर्गत बेगमपूर येथे हातभट्टी दारू गाळणाऱ्या भट्टीवर छापा मारून एकूण 10 बॅरल , तब्बल दोन हजार लिटर , 53,750 रुपये किंमतीचे गुळमिश्रित रसायन ताब्यात घेण्यात आले. शहरातील गुन्हे शाखेतील अधिकारी शैलेश खेडकर यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कामाची चुणूक दाखवली. आज शनिवारी चार सप्टेंबर रोजी सदर कारवाई पार पाडण्यात आली.

बेगमपूर येथील ‘त्या’ठिकाणी छापा मारताच आरोपी दत्ता भोई पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

ताब्यात घेतलेले रसायन जागीच नष्ट करून आरोपी दत्ता तुळजाराम भोई याच्याविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात IPC 328, सह दारूबंदी कायदा कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


ही कामगिरी तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक,
श्री. अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधीक्षक,
श्री. सर्जेराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सचिन वाकडे, हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे, पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख, महिला पोलीस नाईक अनिसा शेख,महिला पोलीस कॉन्स्टेबल सरस्वती सुगंधी .स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण.
यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here