सामाजिक ऋण फेडण्यासाठी करा वृक्षारोपण : अमर पाटील यांचे आवाहन

0

Mh13news Network

झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे जागतिक तापमान वाढीसारख्या समस्या उद्भवत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सामाजिक ऋण फेडण्यासाठी सर्वांनी विशेषतः युवकांनी पुढे होऊन अधिकाधिक वृक्षारोपण करावे असे आवाहन हत्तुर जि. प. सदस्य अमर पाटील यांनी केले.

युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रूप येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंद्रूपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रमेश नवले, विद्यमान तालुकाप्रमुख योगीराज पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख धर्मराज बगले, विजयकुमार वाले, अप्पासाहेब व्हनमाने, संदीप मेंडगुदले, चिदानंद घाले, धनंजय सिंदखेडे, निंगराज हुळ्ळे, सुनिल शिंदे, सुभाष मरीआईवाले, सागर कोकरे, सिराज मकानदार, रमेश निंबर्गी आदी उपस्थित होते.

वाढते अपघात व कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी गावोगावी रक्तदानाची चळवळ वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहनही जि. प. सदस्य अमर पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच एकूण ५२ जणांनी रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here