अवघी बारा वर्षाची मुलगी झाली माता ; पंढरपुरातील दुर्दैवी घटना

0

Mh13news Network

सोलापुरातील पंढरपुरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून यामुळे माणुसकीला काळीमा फासली गेली आहे.
पंढरपूर शहरातील एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शनिवारी बालकाला जन्म दिला. या बालकाचा पिता कोण हेही या मुलीला माहिती नाही. पंढरपूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद केली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली होती.

पोलीस सूत्रांनुसार, या अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला. त्यातूनच ती गर्भवती राहिली गेली असावी. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्या मुलीची तपासणी करण्यात आली. यावेळी ती गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. मुलीचे वय कमी असल्याने डॉक्टरांनी शनिवारी सीझर करून प्रसूतीक्रिया तिची पार पाडली. यात तिने दीड किलो बाळास जन्म दिला. यानंतर मुलीच्या आईने अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी भादंवि ३७६, ३७६ (२) (आय) (जे) बाललैंगिक अत्याचार कलम ९ अन्वये गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here