राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे १२२ रुग्ण झाले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११६ वरून १२२ इतकी झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुंबईत पाच नवीन रुग्ण आढळले आहेत तर ठाण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
महाराष्ट्रात आज दुपारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११६ इतकी होती. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले होते तर मुंबईत ४ रुग्ण आढळून आले होते. दुपारनंतर त्यात आणखी सहा जणांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या १२२ पर्यंत पोहचली आहे.