जिल्ह्यात येण्यासाठी ‘या’ 1117 नागरिकांना मिळाली परवानगी

0

MH13 NEWS Network 

सोलापूर दि. 10 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 1117  नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 1211 नागरिकांना अशी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी 2328 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.

एक मे पासून covid19.mhpolice.in या वेबसाईट आजपर्यंत 22127 अर्ज प्राप्त  झाले असून 6498  जणांना परवानगी देण्यात आली आहे. 5045 अर्जांना परवानगी नाकारली असून 10584 अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. तर काही अर्ज इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने  प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण  9447 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी 5509 जणांना परवानगी दिली आहे तर 3938 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.

 

सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारे व्यक्ती 

अ.क्र.

जिल्हा

 व्यक्ती

1

पुणे शहर

553

2

दैांड, जि. पुणे

416

3

मुळशी,जि. पुणे

09

4

रत्नागिरी

05

5

नागपूर

04

6

धुळे

03

7

शिरुर, जि. पुणे

03

8

मावळ

03

9

खंडवा(मध्यप्रदेश)

92

10

नवरंगपूर (ओदिशा)

27

11

बंगळूरु (कर्नाटक)

02

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here