ग्रामीण | काळजी घ्या; मृत्यूचा आकडा थांबेना, आज 47 जणांचा मृत्यू

0

Mh13news Network

आज दि.10 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1160 कोरोणाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज सोमवारी 10 मे रोजी ग्रामीण भागातील 1160 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 680 पुरुष तर 480 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1747 आहे. यामध्ये 1102 पुरुष तर 645 महिलांचा समावेश होतो. आज 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 5331 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4171 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here