MH13 NEWS Network
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाला असून सोलापुरातील मृत्यू पावलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 7 झाली आहे. अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दुपारी दिली.आज पर्यंत या विषाणूमुळे 6 जणांना प्राण गमवावे लागले होते.त्यामध्ये 3 पुरुष तर तीन स्त्रियांचा समावेश होता. मोहोळ तालुक्यातील पाटकुल भागातील महिलेचा मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी सायंकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील 128 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे सांगितलं होतं. रविवारी सायंकाळी सोलापुरातील कोरोना बाधित मृत व्यक्तींची संख्या ही सहा होती यामध्ये एका महिलेची भर पडली असून सोलापुरातील कोरोना बाधित मृत व्यक्तींची संख्या आता सात झाली आहे.
नागरिकांनी घाबरू नये ; काळजी घ्यावी
या या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये सरकार रेड झोन मधील सोलापूर वर विशेष लक्ष ठेवून आहे प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे आणि काळजी घ्यावी . बाधितांचा आकडा वाढत जरी असला तरी बरे होण्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे.
दत्तात्रय भरणे ,पालकमंत्री
सोलापूर