पुढारी की मास्तर..! आता सुरू होणार स्वामींची ‘शाळा’..!

0

अनेकदा विद्यादानाचे काम करणारे शिक्षक पुढारीपणा गाजवत आपले कार्यक्षेत्र सोडून जिल्हा परिषदेमध्ये फिरतात,मस्टरवर नावालाच सही करून फिरणाऱ्या मास्तर मंडळींना चाप घालण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे.


सिईओ यांचे दालनात आज शिक्षण विभागातील जिल्हा व तालुका स्तर अधिकारी यांची आढावा बैठक घेणेत आली. या बैठकीस शिक्षणाधिकारी संजय जावीर, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, विस्तार अधिकारी राऊत, विस्तार अधिकारी गुरव प्रमुख उपस्थित होते.

कार्यालयात भेट देणारे साठी रजिस्टर राहणार –

पूर्वपरवानगी शिवाय अनधिकृतपणे जिल्हा कार्यालयात शिक्षक हिंडत असतात.यापूढे मूख्याध्यापकांचे लेखी आदेश असल्याशिवाय वरीष्ठ कार्यालयात येऊ नयेत.सर्व विभागाने कार्यालयात येणार्‍यांसाठी रजिस्टर ठेवावे.शिक्षक बदली प्रक्रियेचे कामकाज विहीत मुदतीत पूर्ण करावे. एक डिसेंबर पासून सर्व कर्मचारी व अधिकारी यांना ओळखपत्र अनिवार्य आहे.

एक डिसेंबर पासून सर्व कर्मचारी व अधिकारी यांना ओळखपत्र अनिवार्य –
………….

शाळेत उशीरा येणार्‍या व गैरहजर असणार्‍या शिक्षकांवर कारवाई करून वरीष्ठ कार्यालयास अहवाल सादर करावे.सर्व‌ गटशिक्षण्यांधिकारी यांनी अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना सेवा हमी कायदा,माहिती अधिकार कायदा, कार्यालयीन कामकाज याबाबत लेखी आदेश देऊन विहीत मूदतीतच सर्व कामकाज पूर्ण करावे.ओळखपत्र, गणवेश, कार्यालयीन वेळा याबाबत लेखी आदेश द्यावेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here