चिमुकल्यांच्या मराठी शाळेची अनोखी ‘झुकझुक गाडी’.!

By- धोंडप्पा नंदे /MH13 NEWS

अक्कलकोट येथील मौजे गळोरगी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेने अनोखी अशी झुक झुक गाडी बनवली असून यामुळे संपूर्ण तालुक्यात या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

चिमुकल्या मुलांच्या या शाळेत आगळ्या वेगळ्या प्रकारचे रंगकाम केल्याने संपूर्ण शाळा एक रेल्वेगाडी दिसते. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कुतूहल निर्माण होत आहे. त्याच सोबत ,’आमच्या मुलांना शाळेत येण्याची रुची निर्माण होत असल्याचे’ पालकांनी आवर्जून माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत बिराजदार यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम करण्यात आले आहे.शाळेचे संपुर्ण रंगकाम रविकांत गुंडप्पा बिराजदार यांनी स्वखर्चाने केले आहे.

याआधी शाळेचे रंगकाम पूर्णपणे खराब झाले होते. शाळेच्या खोल्यांची काहीशी पडझड झालेली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय पाहता शाळेचे नुतनीकरण आणि रंगकाम करणे गरजेचे होते.या आधी शाळेला तार कुंपण पण त्यांच्या विशेष प्रयत्नातुनच झाले होते.

सध्या या संपूर्ण शाळेला आगगाडीचे हुबेहुब स्वरूप प्राप्त झाले आहे. आता गळोरगी मधील विद्यार्थी मोठ्या उत्साहात शाळेत जातात.या आनंददायी रंग कामामुळे दैनंदिन वाढत्या अभ्यासक्रमाचा दबावातुन या चिमुकल्यांना मनोरंजनातुन शिक्षण मिळण्यासाठी मदत होत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती माध्यमांतुन हा एक चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. याचे समस्त गळोरगी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. या शाळा रूपी रेल्वेला गळोरगी ते अक्कलकोट एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रविकांत बिराजदार,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री चंद्रकांत पाटील,श्री शिवराय प्रचंडे,श्री संतोष जमादार सर,श्री सचिन बणजगोळ ,श्री सिध्दाराम बिराजदार ,श्री संतोष जकापुरे ,ग्रामपंचायत शिपाई श्रीशैल पुजारी आणि समस्त गळोरगी ग्रामस्थ उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘रोहन’चा वाढदिवस ठरला आरोग्यदायी ; प्रतिबंधित क्षेत्रात केली अशी मदत

मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रतिबंधित क्षेत्रात आर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॕथीक गोळ्यांचे मोफत वाटप केल्याने मुलगा रोहन…

30 mins ago

Morning Update : 4 पुरुष तर 3 महिला बाधित ; 1 मृत

MH13 NEWS Network  आज सोमवारी सकाळी  7 बाधित रुग्णांची वाढ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली…

8 hours ago

सोलापुरात नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण ; 5 जणांचा मृत्यू

आज प्राप्त झालेले एकूण अहवाल 120 असून निगेटिव्ह अहवाल 102 आहेत. पॉझिटिव्ह अहवाल 18 आढळून…

20 hours ago

सध्या 19 हॉस्पिटल ; म. फुले जनआरोग्य योजनेत सहभागी व्हावे.!

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप कुमार ढेले यांचे आवाहन सोलापूर दि. 24 - सोलापूर शहर आणि…

21 hours ago

Live : संकटात ‘राजकारणा’पेक्षा जबाबदारी पार पाडणे महत्वाचे- मुख्यमंत्री ठाकरे

लॉकडाऊन शिथिल करतांना विविध क्षेत्रांना गती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दिनांक २४: संकटाच्या काळात राजकारण न…

1 day ago

मोठा निर्णय : राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

MH13 NEWS Network  मुंबई, दि. २४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य…

1 day ago