Categories: Uncategorized

शुभ_वार्ता: लाखो किलोमीटर अंतर कापून हिवाळी पाहुणे आपल्या भेटीसाठी जिल्ह्यात दाखल!

MH13 NEWS NEWTWORK:

यंदा सुरुवातीला रुसलेल्या पावसाळ्यामुळे कोरडेठाक पडलेले जिल्हातील बहुतांश पाणस्थळे व ओसाड रानमाळे तसेच शेतशिवारात दर वर्षी विदेशातून स्थलांतर करूनज्ञजिल्हात दाखल होणारे पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाबद्दल साशंकता होती; मात्र पावसाळा अंती बरसलेल्या धुंवाधार पावसाने जिल्ह्यातील सर्व पाणवठे तुडुंब भरले आहेत शिवाय माळराने हिरवाई ने बहरली आहेत. या मुळे परदेशी पक्ष्यांना पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांच्या साठी पर्वणीच उपलब्ध झाली आहे. या पोषक वातावरणाचा अंदाज घेत प्रवाशी पक्षी जिल्ह्यात येऊन दाखल होत आहेत.
विविध प्रकारच्या फ्लाय कॅचर, बी ईटर, नीळकंठ, चातक, विविध धोबी पक्षी, जलस्थानांवर वावरणारे तुतुवार, नदी सुरय, समुद्र पक्षी, मत्सयगरूड आणि नाना तऱ्हेच्या बदकांची पहिली तुकडी आॅक्टोबर महिन्यात येऊन दाखल झाल्याची नोंद पक्षी व पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

जिल्ह्यातील शेतशिवारातील पिकांच्या गर्दीत व गवताने अच्छादित झालेल्या माळरानांवर तसेच पाणवठ्यावर युरेशियन व भारतीय नीलकंठ, चातकासह विविध फ्लाय कॅचर, पर्णवटवट्या, बी ईटर, धोबी, नदी सुरय, तुतूवार, मत्सयघार, गरूड, समुद्र पक्षी (गल्स), पाणटिवळा (गाॅडविट) परी (शाॅव्हलर), सोनुला या बदकांची पहिली तुकडी गेल्या महिन्यात येऊन दाखल झाले आहेत. सद्या जाणवत असलेल्या बेताच्या थंडीत हे विदेशी पक्षी जिल्ह्यात विखरून राहून पुढील तीन-चार महिन्यासाच्या अधिवासासाठी जम बसवत आहेत. पहिल्या लाटेत आलेले हे पक्षी सद्या एकाच ठिकाणी गर्दी न करता आपापल्या अनुकूल पाहून विविध जलस्थान व माळरानांवर विखरून राहिले आहेत.

स्थलांतरित पक्षी साधारणपणे तीन टप्प्यांत जिल्ह्यात येतात. डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीपर्यंत चक्रवाक, पट्टकदंब, नाकेर (नकटा), शेंद्रया बड्डा (पोचार्ड), काणूक (टील्स), सरग्या (पिनटेल), बटवा, ससाणे (केस्ट्रल) मत्स्य गरूड, शिखरा (हाॅबी),भोवत्या, मधुबाज (मोहाळ्या बझर्ड) हे पक्षी दुसऱ्या लाटेत येऊन दाखल होतात; तर तिसऱ्या लाटेत डिसेंबर शेवटी व जानेवारी महिन्यात रोहित (फ्लेमिंगो), पट्टकदंब (बार हेडेड गूज), कलहंस (ग्रे लॅग गूज), चक्रवाक (ब्राह्मणी डक), चिखल बाड्डा (गार्गेनी), श्वेतबलाक, क्रौंच (डोमसाईल व सायबेरियन क्रेन्स), फॅलोरोप हे पक्षी जिल्ह्यात येऊन दाखल होतात.

विदेशी पक्षी सामान्यतः तीन कारणांसाठी स्थलांतर करून येतात. युरोप, दक्षिण आफ्रिका, खंडांसह सायबेरिया, अफगाणिस्तान, हिमालय या शीत प्रदेशात हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते; त्यामुळे तेथील पक्षीजीवन बाधित होते. त्यांना खाद्यान्नाची तुटवडा भासू लागते.शीत प्रदेशातील हे पक्षी आपले जीवन सुसह्य करण्यासाठी भारतीय उपखंडातील विविध ठिकाणी येऊन दाखल होतात. भारतात येऊन पाहुणे म्हणून वावरत हे विदेशी पक्षी सोलापूर जिल्ह्यातील निवडक जलस्थाने व माळरानांवरील अन्नाचे भक्षण करत आपले उदर निर्वाह करून घेतात. पुढील तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर परत हे पक्षी आपल्या मूळस्थानी परततात. दरवर्षी हाच क्रम अनुभवण्यास मिळतो; मात्र स्थलांतरित पक्ष्यांचे जीवनक्रम हवामानावर अवलंबून असते.

हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास करून आलेले चिमुकल्या ते महाकायी स्थलांतर पक्ष्यांचे सोलापूर जिल्ह्यातील विविध पाणवठे व माळरानांवर पुढील दोन-तीन महिने संमेलन भरणार आहे; त्यामुळे यंदा जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील पक्षी निरीक्षकांना पर्वणी ठरणार आहे. दूरवरून येऊन आपल्याला हर्षोल्लास करणाऱ्या या गगनभरारींना पोषक वातावरण मिळवून देण्यासाठी निसर्ग प्रेमींनी पर्यावरणाचे समतोलन राखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
@ डाॅ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक, अकलूज

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

2 hours ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago