शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र सरकार ने नियमावली जाहीर केलीआहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोन मध्ये सूट देण्यात आली आहे. अर्थात जिल्हा पातळी वर जिल्हाधीकारी अन महापालिका क्षेत्रात आयुक्तांना काही बदलांसह अधिकार देण्यात आलेत . त्यांच्याकडुन आदेश पारित होतील .

शासन आदेश नुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात जनजीवन सुरुळीत होणार सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत व्यायामाला मुभा
सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना,


प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल
डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे.
गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत. सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील
मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.
खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारीवर्गसह उघडू शकतात.

लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय बंद?
शाळा, महाविद्यालयं, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्था राज्यभरात बंद राहतील.
प्रवाशांना विमानाने अथवा रेल्वेने प्रवासास बंदी असेल.
सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि सार्वजनिक कार्यक्रमाची स्थळं हेही बंद असतील.
माजिक, राजकीय, खेळविषयक, मनोरंजन, विद्यापीठीय, सांस्कृतिक आणि धार्मिक
कार्यक्रमांना/सभांना बंदी असेल.
धार्मिक स्थळं आणि प्रार्थना स्थळं नागरिकांसाठी बंद असतील.
केशकर्तनालये, सौदर्य प्रसाधने (ब्युटी पार्लर), स्पा, सलून बंद असतील.
शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरन्ट आणि इतर सेवा बंद राहतील.
कुठल्या टप्प्यात कशाला परवानगी
पहिला टप्पा – येत्या 3 जूनपासून पहिला टप्पा सुरु होईल.
दुसरा टप्पा – येत्या 5 जूनपासून दुसरा टप्पा सुरु होणार आहे. दुसऱ्या
टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9
ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.
ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही
सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम
डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी. जवळच्या बाजारात
जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ
बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2
दुचाकी – केवळ चालक
तिसरा टप्पा – येत्या 8 जून पासून तिसरा टप्पा सुरु होईल. या टप्प्यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात.
इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे.
सरकारने अनलॉकिंग प्रक्रिया सुरू केली आहे याला मिशन बिगीन अगेन असे म्हंटले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago