आम्ही नाही समाजाचे ‘शत्रू’ : हे आहे गरजेचं…वाचा

MH13NEWS Network

सोलापुरात भाजीपाला वस्तू खरेदीसाठी एका बाजूला खूप मोठी झुंबड दिसते तर दुसरीकडे एक सकारात्मक चित्र दिसून येत आहे सोलापुरातील दुकानदार आपल्या दुकानासमोर वर्तुळे आखून ग्राहकांसाठी कोरोनाची बाधा दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोलापुरातील बाळे भागातील एका दुकानदाराने अशी खबरदारी घेतलेली दिसून येते दरम्यान, पोलिस प्रशासनाने अत्यावश्यक वस्तूंचे विक्री करताना स्वयंशिस्त पाडावी असे आवाहन वारंवार केले आहे.

बाळे येथील लोकमंगल विहार कडे जाणाऱ्या भाजी मंडईत मोठी गर्दी दिसून आली तर येथूनच जवळ असलेल्या महालक्ष्मी गृह वस्तू भांडार येथे एक मीटर अंतरावर ग्राहकांसाठी चौकटी केल्या होत्या. त्यामध्ये ग्राहक उभे राहत असून नंबर आल्यानंतर सॅनीटायझरने हात धुतात. आणि आणि जीवनावश्यक वस्तू विकत घेतात असे चित्र दिसून आले. ग्राहकांनीही या सुरक्षित सोशल डिस्टनिंग साठी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

बाळे भागातील या व्यापाऱ्याने आम्ही समाजाचे शत्रू नाही. आम्ही या संसर्गापासून आमचे आणि आमच्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहोत .इतर लोकांनीही समाज मित्र बनावे असे आवाहन केले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

10 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

12 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

23 hours ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago