मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन उत्तम व्यासपीठ ;गटशिक्षणधिकारी नागणसुरे

धोंडप्पा नंदे,MH13NEWS,नेटवर्क

मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी नागणसुरे यांनी केले. वागदरी येथील जि.प.प्राथमिक मराठी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी
शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे सह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी तंटामुक्ती अध्यक्ष रतन बंगरगी होते. प्रतिमा पूजन गुरूशांत मग्गी,पदवीधर शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष व लक्ष्मण सोनकवडे मुख्याध्यपक शिरवळ यांच्या हस्ते करण्यात आले तर दीपप्रज्वलन सुमिञा सोनकवडे गुलबर्गा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शंकर घुगरे विस्तार अधिकारी, प्रसिद्ध उद्योगपती मकानदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा.राहुल रुही अध्यक्ष सिद्धार्थ सोशल फौडेशन यांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेहसंमेलनाची सुरुवात शहीद जवानांना श्रद्धाजंली अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर विविधरंगी अशा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात झाली. यामध्ये भरतनाट्यम्, कोळीगीते, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच नाटक, विविध वेशभूषा सादर करत वागदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला.

वागदरी शाळेने पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य साजरा होणारा वार्षिक स्नेहसंमेलन या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले. या संमेलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद देऊन कौतुक केले
यावेळी विशेष प्रमुख पाहुणे गटशिक्षणधिकारी पंचायत समिती अक्कलकोट मा.राजशेखर नागणसुरे उपस्थित राहुन मार्गदर्शन केले नेटके नियोजन मुलांचे शिक्षकांचे कौतुक केले
म्हणाले शालेय शिक्षणाबरोबरच कलागुणांची जोपासना झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांत बाल आनंद मेळावा, वार्षिक स्नेहसंमेलन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सुचविले
वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी चंद्रावर यमाजी,अविनाश पाटील,आर.के.स्वामी,शारदा कापसे,मनिषा कुनाळे,वर्षा गिरी,संजीवनी मोटे यानी परिश्रम घेतले.
यावेळी गावातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली त्यात बा.ना.चव्हाण ,सैदपा इंगळे,सायबू गायकवाड ,कमलाकर सोनकांबळे,विरभद्र यादवाड,अशोक पोमाजी ,पंचप्पा सोनकवडे,पुंडलिक वाघमारे आदि मान्यवर तसेच मुलांना मार्गदर्शक लाभले नागराज घुगरे,सचिन चिंचोळी,महेश पोमाजी,सचिन पोमाजी,विनोद घुगरे,सागर पोमाजी,प्रविण सोनकवडे,अमर मडपती,विजय गावडे ,भव्य दिव्य कार्यक्रमाचे नेटके सूञसंचालन महादेव सोनकवडे यानी केले आभार रेखा सोनकवडे यांनी मानले
चिमुकल्या शाळकरी मुलांचे नृत्य व कलाकृती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक, गावातील नागरिक उपस्थित होते

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु,…

7 hours ago

सोलापूर- पुणे हायवेवर विचित्र अपघात : तिघांचा मृत्यू, चौघे जखमी

BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माढा तालुक्‍यातील अरण येथे रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अपघात झाला. या…

8 hours ago

चहावाला पंतप्रधान होतो तर चहापानावर बहिष्कार का? – मुख्यमंत्री ठाकरे. वाचा ठाकरेशैली…

MH13 NEWS Network: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला कोपरखळी मारली. पत्रकार परिषदेतील…

9 hours ago

अजून किती बळी ? मार्केटयार्ड सर्व्हिस रोडवर जड वाहनाचं पार्किंग

BY MH13 NEWS NETWORK :  सोलापूर मार्केट यार्ड मधील सर्व मोठी वाहने रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर 24 तास उभे करत असल्याचे दिसून…

10 hours ago

राजन पाटील यांच्यावर अधिवेशनानंतर येणार नवी जबाबदारी!

MH13 NEWS Network: विधानसभा निवडणुक रणधुमाळीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये…

11 hours ago

पुरुष गट राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा…

BY MH13 NEWS NETWORK : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित वरिष्ठ गट पुरूष आंतर जिल्हा स्पर्धा या दी. १२ ते…

12 hours ago