वागदरी जि.प शाळेत ‘माता पालक’ मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
12

By-MH13 NEWS,वेब/टीम

जि.प.प्रा.शाळा,वागदरी येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन मुख्याध्यपिका रेखा सोनकवडे यानी केले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी सौ.आशाराणी महादेव नंदे यानी भूषवले व उदघाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.रेणूका फुलमाळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे शिक्षक आर.के.स्वामी यांनी केले.


यावेळी शाळेच्या मुख्याध्यपिका रेखा सोनकवडे यानी उपस्थित महिलानां मार्गदर्शन करताना संक्रातीचे ऐतिहासीक व भौगोलिक महत्व,तीळगुळाचे महत्व सर्व महिलांना सांगितले.
मुलींच्या बालविवाहाचे दुष्परिणाम,किमान पदवी पर्यंतचे शिक्षण,शारीरिक स्वच्छता,शाळेतील ई-लर्निंग इ.विषयी माहिती सांगून शाळेसाठी लोकवाटा व आपल्या पाल्याला विकसीत भारताचे सुजान नागरीक बनविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ.आशाराणी नंदे यानी बोलताना म्हणाल्या कि,’ मुलांना घडविण्यासाठी व संस्कार सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आई – वडिलांची पण आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सर्व शाळा व शिक्षकांवर ढकलून उपयोग नाही. पालक म्हणून आपली जबाबदारी आपण पूर्ण करतो का? याचा विचार प्रत्येक आई वडीलानी केले पाहिजे.

माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमास आलेल्या सर्व महिलांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शाळेतील शिक्षिका शारदा कापसे,संजीवनी मोटे,मनिषा कुनाळे,वर्षा गिरी यानी केले यावेळी चांगुणा बाबर,महानंदा करजगी,रेखा सुतार,अनिता सगट,किरण बनसोडे,उषा हुगार,महादेवी वमने,कविता रेऊरे,पूजा मोहरकर,कातिका हेबळे,रागीनी माळी,सुरेखा खसगी,चनम्मा परिट,रत्नाबाई भरमदे,मलम्मा मडपती भौरम्मा निंबाळे,श्रीदेवी फुलमाळी,गंगूबाई पवार,मोहिनी बंडगर,अंबिका मंजुळकर व शशिकला मंजुळकर आदि बहुसंख्य महिला कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत यमाजी,आर.के.स्वामी सह सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here