मंदिराचे गोपूर पूर्ण होताच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार !

वागदरी परमेश्वर मंदिरावर साकारतेय दक्षिण पद्धतीचे गोपूर

0
20

By– (धोंडप्पा नंदे) एमएच१३न्यूज वेब/टीम

महाराष्ट्र,कर्नाटक व मराठवाडा च्या सीमेवर असलेले वागदरीस आध्यात्मिक वारसा लाभला आहे. वागदरी येथील ग्रामदैवत श्री. परमेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून सीमावासीयांमध्ये  प्रसिद्ध आहे. पुरातन व ऐतिहासिक परमेश्वर मंदिरात वर्षातून दोनवेळा भव्य याञा होत असते.यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येथे हजेरी लावतात.या जागृत देवस्थान असे नावलौकिक असलेल्या परमेश्वर मंदिराचे प्रवेशद्धार भव्य दिव्य व वैशिष्ट्यपूर्ण असावे म्हणून लोकवर्गणीतून मंदिरास भव्य गोपूर करण्याचा संकल्प देवस्थान पंचकमिटीने हाती घेतला आहे.

श्री परमेश्वर गोपूर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे विशेषतः गोपूर आपल्या महाराष्ट्रात कुठेच पाहण्यास मिळत नाही. पण दक्षिणेकडील राज्यात कर्नाटक,तेलंगणा,आंध्रप्रदेश, केरळ व तामिळनाडू या राज्यातील मंदिराचे प्रवेशद्धारावर भव्य दिव्य गोपूर पाहायला मिळतात.अशाच पद्धतीने दक्षिणेकडील असलेल्या गोपूर सारखी कलात्मकता येथे बांधकाम करताना केली जात आहे.पांढऱ्या शुभ्र दगडावर अतिशय सुंदर व सुरेख कोरीव नक्षीकाम केलेल्या दगडी बांधकाम सुरू झाले आहे.

कर्नाटकातील कामगार वर्ग या गोपूर बांधकामासाठी आलेला आहे. भव्य दिव्य परमेश्वर मंदीराचे गोपूर काम पूर्ण झाल्यानंतर वागदरी हे पर्यटन स्थळ म्हणून निश्चितच विकसित होणार आहे. पर्यटन स्थळ झाल्यावर पर्यटकांची संख्या वाढणार आहे.यामुळे येथील भागात अध्यात्मिक पर्यटन वाढीस लागल्याने रोजगार निर्मिती होऊन अनेकांना काम मिळेल. पर्यायाने वागदरीचा विकास झपाटयाने होऊ शकतो.
दानशूर भक्ताच्या सहभागमुळे लोकवर्गणीतून श्री परमेश्वर मंदिरासमोर भव्य गोपूरम बांधण्याचा संकल्प वागदरी गावातील लोकांनी घेतला आहे.तो पुर्णत्वास नेण्यासाठी धडपड करणारी  अनेक भाविक आहेत.ग्रामस्थ मंडळी तन मन धन रुपात काम करत आहेत.

भाविकांनी दयावा मदतीचा हात..

गोपुराचे६० टक्के काम पूर्ण झाले असून खूप काम बाकी आहे देवस्थान समितीच्या आर्थिक अडचणी मुळे काम संथगतीने सुरू आहे.लोकसहभाग व लोकवर्गणीतून हे ईश्वरी कार्य पूर्ण होऊ शकते. भाविकांनी आपल्या इच्छेनुसार या कामासाठी मदतीचा हात द्यावा.
श्री सिद्धाराम बटगेरी / नागप्पा घोळसगांव
परमेश्वर देवस्थान प्रमुख
मोबाइल नंबर – 9011414581

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here