Categories: राजकीय

विषप्रयोगाच्या आरोपानंतर महापालिकेत आळीमिळी -गुपचिळी..!!

महेश हणमे
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरांवर थेट आरोप केल्याने शहर व जिल्हा परिसरात याचे अनेक पडसाद उमटले. स्वपक्षीयांवर केलेल्या आरोपांमुळे सहाजिकच भाजपच्या गोटात कमालीची शांतता दिसून आली. छोट्या छोट्या विषयांवर प्रचंड गदारोळ करणारे पदाधिकारी,नेते व मनपा आवारात नेहमी येणारे अनेक पक्षांचे कार्यकर्ते यांची या स्फोटक घटनेविषयी आळीमिळी गुपचिळी दिसून आली.
भाजपचे माजी सभागृहनेते व दबंग छबी असणारे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या घटनेनंतर अनेक उलट सुलट चर्चा घडत होत्या. पोलिसांना निवेदन देऊनही तपासात गती येत नसल्याने आंदोलनेही घडली .थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने गेली. सीआयडी व सीबीआय चौकशीची मागणी लावून धरण्यात आली. सर्व पक्षांच्या मोर्चाने शहर परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सोमवारी सुरेश पाटलांनी त्यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेऊन महापौरांसह त्यांचे पती तसेच भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक अशी पाच जणांची नावे विषप्रयोग करणाऱ्या संशयितांच्या यादीमध्ये घातली होती. त्याचसोबत इतरही संबंधित काही जणांची चौकशी व्हावी असे पोलिसांना दिलेल्या अर्जामध्ये नमूद करण्यात आले होते. यामुळे भाजप गोटात कमालीची अस्वस्थता व शांतता पसरली होती.
मंगळवारच्या सकाळपासून महापालिकेतील एक ही पदाधिकारी नेता व कोणताही कार्यकर्ता याविषयी बोलण्यास तयार नव्हता. एखादा शब्द बोलला तरी बालंट येईल की काय ? अशा काहीशा भीतीने कोणीच बोलण्यास तयार नव्हते.

सुरेश पाटील यांनी दिलेल्या अर्जानुसार पोलिसांनी पाचही संशयितांना व त्याचसोबत तक्रारी अर्जामध्ये उल्लेख असलेल्या सर्वच लोकांना समन्स बजावले आहे.

कोर्टाची तारीख असल्यामुळे आज जबाब नोंदवण्यास हजर राहू शकत नसल्याचा अर्ज महापौरांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago