Categories: राजकीय

प्रभाग क्र.4 मध्ये विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद

विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 4 मध्ये विराट पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेस महिला युवक युतीसह ज्येष्ठ नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या पदयात्रेची सुरुवात तरटी नाका पोलिस चौकी लगत असलेल्या ह.भ.प.लक्ष्मण महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. पदयात्रेत विजयकुमार देशमुख, महापालिकेचे माजी सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेविका सुरेखा काकडे राजाभाऊ काकडे अनंत जाधव, आदी उपस्थित होते.

बुधवार पेठ वडर गल्ली येथून पदयात्रेला सुरुवात झाली वडर गल्ली मधील नागरिकांनी केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या रांगोळ्या घालून माहिती चे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

पुढे ही पदयात्रा बाळीवेस,बुधले गल्ली, काशी कापडी गल्ली, साळुंखे गल्ली येथे आल्यानंतर शिवसेना नेते सचिन साळुंखे यांनी देशमुख यांचे जंगी स्वागत करत पदयात्री वर पुष्पवृष्टी केली…. पदयात्रा मराठा वस्ती येथे आल्यानंतर परिवहन सभापती गणेश जाधव आणि अनंत जाधव मित्र परिवाराच्या वतीने भाजप शिवसेनेचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करत जंगी सत्कार केला यानंतर ही पदयात्रा बागले वस्ती येथे ते आल्यावर येथील नागरिकांच्या वतीने नगरसेविका सुरेखा काकडे यांनी देशमुख यांचे औक्षण केले यानंतर ही पदयात्रा हा विर फकिरा चौक येथे आल्यानंतर प्रभाग क्रमांक चार च्या नगरसेविका वंदना गायकवाड आरपीआय आठवले गटाचे कार्याध्यक्ष अजित गायकवाड हे आपल्या समर्थकांसह बॉबी चौकातून येत या पदयात्रेत सामील झाले यावेळी निळा आणि भगवे झेंडे हातात धरलेल्या स्त्रिया आणि युवक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते जणू काही या परिसरात भीमशक्ती आणि शिवशक्ती चा संगम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते पुढे पदयात्रा सम्राट चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आले यावेळी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी उद्यानातील महामानव बोधिसत्व डॉ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं…. प्रभाग 4 मधील मुकुंदनगर येथे हे पदयात्रा आल्यानंतर डिके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे गौतम कसबे यांच्या या परिवाराकडून देशमुख यांच्यावर पुष्पवृष्टी करत औक्षण करण्यात आले.

घरोघरी महिलांनाकडून महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे औक्षणांने स्वागत करण्यात आले. पदयात्रेच्या रस्त्यावर स्वतः मतदारांनी रांगोळी,फुलांचा सडा टाकुन व व केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या रांगोळ्या घालून विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा दिल्याची माहिती नगरसेवक विनायक विटकर यांनी या वेळी दिली.

विजयकुमार देशमुख एक हक्काचे नेते आहे त्यांनी आरोग्य सेवेत वाखाणण्यासारखे काम केले आहे, मुख्यमंत्री साहाय्याता निधीच्या माध्यमातून गरिबांना निधी मिळवून देणे, ड्रेजेन, रस्ते,पाण्याची पाईप पाईन या कामांची पूर्ती, स्मार्ट सिटीच्या कामास मंजुरी, उड्डाणपूलास निधी,नवीन महिला व बालकांसाठी सिव्हिल हॉस्पिटल मंजुरी या जनहिताच्या प्रश्नांबरोबर कार्यकर्त्यांचे लग्न , वाढदिवस, कार्यक्रम, विविध समस्या अश्या अनेक गोष्टींशी बांधील असणारा एक संवेदनशील नेता म्हणून मितभाषी अश्या महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांची ओळख असल्याने आज उस्फुर्तपणे पदयात्रेस प्रतिसाद मिळाला.तीन वेळा या मतदारसंघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून पुन्हा एकदा चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने ते विजय होतील असा विश्वास अनंत जाधव यांनी व्यक्त केला.

दलित समाजाच्या अनेक योजना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामुळे या जनतेपर्यंत पोहोचले आहेत दलित वस्ती मध्ये विकासाची गंगा आणली या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विजयकुमार देशमुख यांनी केले आहे त्यामुळे यावेळेस सर्वात जास्त मताधिक्य आहे दलित बहुल भागातून देशमुख यांना मिळेल आणि ते विजयी चौकार मारतील असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्याध्यक्ष अजित गायकवाड यांनी व्यक्त केला.

शिवगंगा मंदिर येथून पुढेही पदयात्रा मीठ गल्ली तरुण मंडळ,बलिदान चौक तरुण मंडळ,महादेव गल्ली तरुण मंडळ,बोरामणी तालीम, येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला

या पदयात्रेत भिमाशंकर बंदपट्टे,सचिन इरकल,राजाभाऊ कलकेरी,शाम मुद्दे,किसन मुद्दे,गौतम भांडेकर,यशपाल शिंगाडे,देवीदास इरकल, अमित सोनसळे,सचिन बुराडे,बंटी यमपुरे,माऊली माने,अमोल कदम,संतोष वडतिले,अख्तर नदाफ,बसवराज भोसले,दत्ता बुराडे,रंजना बुराडे,सिद्राम बुराडे,सुनील गुंगे,सुनील रिक्के, सचिन कुलकर्णी, गणेश साखरे, सुनील शरणार्थी, जयंत गुमडेल, अभिषेक खोबरे, आरिफ तांबोळी, ओंकार कुदरे, अशोक चडचणकर, गिरीश अक्कलकोटे, मनोज मालकूनाईक, नागेश येलमेली यांच्यासह असंख्य भाजप-शिवसेना आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती..

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘या’ तालुक्यातील लोकांना तब्बल 1 कोटी 32 लाखांचा चुना

MH13NEWS Network लोक आशेवर जगतात हे जरी मान्य केले तरी अति हव्यासापोटी लोक स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात, याचा प्रत्यय…

3 hours ago

धक्कादायक : प्रजासत्ताकदिनी ‘येथील’ शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

MH13NEWS Network आजच्या प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक प्रकार पंढरपुरातील शासकीय कार्यालयासमोर घडला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने पंढरपुरातील शेतकऱ्याचा जीव…

10 hours ago

थरारक : पंढरपूरच्या भाळवणीत गोळ्या घालून खून

MH13NEWS Network पंढरपूर तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली आहे.तालुक्यातील भाळवणी गावात विश्वास उर्फ बापू भागवत यांची गोळ्या घालून हत्या…

11 hours ago

सोलापुरात आजपासून ‘येथे’ मिळेल ‘शिवभोजन’

MH13NEWS Network पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात…

11 hours ago

शहरास बनवूया धार्मिक पर्यटन स्थळ ; महापौरांनी प्रजासत्ताक दिनी दिला विश्वास

MH13NEWS Network आजच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास मा.महापौर व मा.पदाधिकारी तसेच विभागीय अधिकारी यांनी पुष्पहार…

15 hours ago

वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

MH13NEWS Network श्री वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर…

1 day ago