…यामुळेच भाजपाला अच्छे दिन – आ. विजयकुमार देशमुख!

MH13 NEWS NETWORK : स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी देशसेवेसाठी आणि पक्ष कार्यासाठी देह झिजविला त्यामुळेच भाजपाला अच्छे दिन आले आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. अटलजींचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. राष्ट्रतेज भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी देशसेवेसाठी पक्ष संघटनेच्या या कार्यासाठी देह झीजवल्याने आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार आहे. अटलजींच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी आणि त्यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.
भवानी पेठ अथर्व गार्डन येथे शिवबसव मल्हार सेना आणि नगरसेवक सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९५ जयंतीनिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आमदार विजयकुमार देशमुख महापौर श्रीकांचन यन्नम, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख महिला अध्यक्ष इंदिरा कुडक्याल, नगरसेविका वंदना गायकवाड प्रतिभा मुदगल सोनाली मुकेरी, उषाताई पाटील, नगरसेवक प्रभाकर जामगुडे, संतोष भोसले, नारायण बनसोडे, नगरसेविका मेनका राठोड, नगरसेविका राधिका पोसा, नगरसेविका रामेश्वरी बिरु, बाळासाहेब अळसंदे, नगरसेवक डॉ. अंनगिरे, संघटन सरचिटणीस बिज्जू प्रधाने, लक्ष्मीकांत गड्डम यांच्या हस्ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
राष्ट्रतेज, भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशसेवेसाठी आणि पक्ष संघटनेसाठी देह झिजविला यामुळे आज भाजपाला अच्छे दिन आले आहेत त्यांच्या कार्यामुळेच आज भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे वाजपेयी यांचे कार्य आणि त्यांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी केले. महापौर श्रीकांचना यन्नम यांनीही मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याला उजाळा दिला. पक्ष मोठा होता संघटना आणि संघटनात्मक बांधणी तेवढीच महत्त्वाची संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा दिल्यामुळे दोन खासदारा वरून आज भाजप लोकसभेत पूर्ण बहुमतात असल्याचे मत भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केले.
प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक तथा माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी प्रास्ताविकात जनता पार्टीचं सरकार असताना अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर सन १९७७ मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात हिंदीतून भाषण केलं. वाजपेयी यांनी ११ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये पाच अणुचाचण्या केल्या या निर्णयामुळे भारत अणुशक्ती संपन्न देश बनला. सुवर्ण चतुर्भुज योजनेअंतर्गत वाजपेयींनी दिल्ली, कोलकता, चेन्नई आणि मुंबई ही मोठी आणि महत्वाची शहरे महामार्गांद्वारे जोडली यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळा‍ली. ग्रामीण रोजगाराला प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांनी खास योजना सुरू केली ग्रामीण विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी दिला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याला उजाळा देत आज त्यांच्याच स्मृति तेवत ठेवण्याचे काम आपण करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केले.
भारतरत्न राष्ट्रतेज माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ३ मधील महिलांना सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर नव्याने नेमण्यात आलेल्या बूथ अध्यक्षाचा सत्कारही माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय पाटील, विजय पुजारी, विनायक पाटील, सुरेश मंदकल, विजय कोळी, सिद्राम शेखशिंदे, चंद्रकांत मुंडे, शिवा हक्के, अब्दुल गुजले, चिदानंद मासरेड्डी, संजय जाधव, किरण वल्याळ, सागर गोटीमुकूल, चंद्रकांत रंगम, बाळू वल्याळ, अप्पा शहापूरकर, लक्ष्मीकांत गड्डम, छोटू गंजी, श्रीपाद इराबत्ती, सुरेश बिदरी, गंगुबाई पुजारी, जगदेवी कोळी, नबीलाल तांबोळी, यूसूफ ईनामदार, अप्पू उळागड्डे, यांच्यासह शिव बसव मल्हार सेनेचे पदाधिकारी व सुरेश पाटील मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले तर आभार श्रीपाद इराबत्ती यांनी मानले

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago