विधानसभेसाठी तयार, महापौरांचे ‘उत्तर’

राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद

0
8

By-एमएच१३न्यूज वेब/टीम

संगमेश्वर महाविद्यालयातील बारावीच्या राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी महानगरपालिका सर्वसाधारण सभेच्या कामकाज पद्धतीची माहिती घेण्यासाठी आले होते. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी विधानसभेची निवडणूक लढण्याचा पुनरुच्चार केला. पक्षाने संधी दिल्यास हे सांगण्यास मात्र ते विसरले नाहीत.

महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना महानगरपालिकेच्या सभेतील कामकाज पद्धतीची संक्षिप्त माहिती दिली.

महापौर पदी असल्यापासून शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम शासनाने मंजूर केले आहे. समांतर जलवाहिनी टाकल्यानंतर सोलापूर शहराचा पाणी पुरवठयाचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. तसेच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रंगभवन येथील सुशोभीकरणाचे काम, रस्त्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच या कामाचा उदघाटन सोहळा होणार आहे. सोलापूर शहराचे पर्यटन वाढावे यासाठी सोलापूर शहरातील श्री सिध्देश्वर मंदिर परिसर व कंबर तलाव परिसर सुशोभिकरणाचे काम, अॅडव्हेंचर पार्कचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे ही महापौरांनी विद्यार्थ्यांना सांगितले.


विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आणि कामकाजाविषयी शंकेला समर्पक उत्तरे महापौर बनशेट्टी यांनी दिली.

यावेळी उपस्थित प्राध्यापकानी महापौर यांना प्रश्न विचारला की, आपण नगरसेविका झालात, महापौर झालात यानंतर आपण विधानसभा किंवा विधान परिषद निवडणुकीस इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारला, यावर महापौरांनी उत्तर दिले की, पक्षाने संधी दिल्यास कोणतीही निवडणुक लढविण्यास मी तयार आहे. यानंतर संगमेश्वर महाविद्यालयाचे वतीने महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा सत्कार प्रा.माने यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here