निर्माल्यातून गांडूळ खताची निर्मिती ; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

0
4

(विशेष प्रतिनिधी/वेब टीम)

जिल्ह्यातील हजारो सदस्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वतीने श्रीबैठकीच्या माध्यमातून एकत्र येत असतात. विविध सामाजिक उपक्रम श्रीबैठकीतून दिलेल्या आज्ञेतून शिस्तबद्ध पध्दतीने केली जात असतात. यंदाच्या वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने विसर्जनस्थळी निर्माल्य गोळा केले जाणार असून त्यातून गांडूळ खत तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे श्रीसदस्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण मोहीम यशस्वीरीत्या राबवली आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये शहर व जिल्ह्यांमधील हजारो गणेश मंडळातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. किमानपक्षी निर्माल्य तरी पाण्यात मिसळून पाणी दूषित होऊ नये, यासाठी श्रीसदस्यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार निर्माल्य गोळा करण्याचे ठरवले आहे.

यातील सिद्धेश्वर तलाव, संभाजी तलाव, तळे हिप्परगा या प्रमुख विसर्जन ठिकाणी निर्माल्य गोळा करण्याची प्रतिष्ठानच्या वतीने व्यवस्था केली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने साठी जवळपास 200 हून अधिक बॅरलची व्यवस्था केली आहे.

प्रत्येक गावातील विसर्जन स्थळी श्रीसदस्य निर्माल्य गोळा करणार आहेत. त्यातून गांडूळ खताची निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे गांडूळ खत प्रतिष्ठानने लावलेल्या वृक्षांना देण्यात येणार असून उरलेले खत शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे.

जवळपास दहा हजार सदस्य श्री सदस्य सकाळी आठ ते रात्री 10 या वेळेत शहरातील व जिल्ह्यातील गणपती विसर्जन स्थळी थांबून ही सेवा बजावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here