सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network

सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव परबळकर (रा. शाहीर वस्ती, भवानी पेठ) यांचा खून करुन संशयित आरोपी वस्ताद आकाश मंडल (रा. पश्‍चिम बंगाल) पसार झाला आहे. पोलिसांनी आकाशविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 11) मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की…

सोलापूर- तुळजापूर रोडवरील हॉटेल सौरभमध्ये कैलास परबळकर हे मागील सात वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम करीत होते. लॉकडाउन असल्याने हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. वस्ताद आकाश हा त्याच ठिकाणी राहण्यास होता. दरम्यान, 13 जूनपासून हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, हॉटेलमधील जेवण विभाग बंदच ठेवून पार्सल दारुची सोय त्याठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे परबळकर हे त्याच ठिकाणी मुक्‍कामी असायचे. शनिवारी वस्ताद आकाश आणि परबळकर जेवण करुन हॉटेलमध्ये झोपले. रविवारी (ता. 12) सकाळी सफाई करण्यासाठी कामगार आला असता त्याला दोघेही त्याठिकाणी दिसले नाहीत. त्यावेळी त्यांनी हॉटेल मालक राजू गुल्लापल्ली यांना फोनवरुन माहिती दिली. माहिती मिळतात मालक गुल्लापल्ली हे हॉटेल परिसरात आले आणि पाहणी केली असता  परबळकर यांचा खून करुन त्यांचे प्रेत हॉटेलच्या मागे टाकण्यात आल्याचे दिसले.लगेचच या घटनेची माहिती त्यांनी तालुका पोलिस ठाण्यास कळविली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलीय. संशयित आरोपी आकाशने व्यवस्थापक परबळकर यांचा खून का केला ? याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

1 hour ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago