सोलापूर पर्यटन ऍपचे अनावरण

सोलापूर – प्रविण गायकवाड यांंनी सोलापूरची समग्र माहिती देणारे मोबाईल ऍप विकसित करून सोलापूरच्या पर्यटन विकासाची फार मोठी गरज पूर्ण केली आहे असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी सोलापुरात बोलताना केले.
सोलापुरातले युवा छायाचित्रकार प्रविण गायकवाड व अक्षय जिंदे या युवकांनी विकसित केलेल्या एमएच १३ आपलं सोलापूर(MH13 aapla solapur) या ऍप्लीकेशनचे अनावरण करताना आ. देशमुख बोलत होते.
श्री. गायकवाड यांनी सोलापुरातली अनेक सौंदर्यस्थळं समाज माध्यमावर टाकून ती लोकप्रिय केली आहेत. आता त्यांनी आपला हा छंद आणि कला अधिक विस्तारित करून सोलापूरचे हे मोबाईल ऍप्लीकेशन तयार केले आहे. सोलापूरकडे अनेक पर्यटक आकृष्ट होत आहेतच पण आता सोलापूरचे ब्रँडिंग करायला आणि आलेल्या पर्यटकांना नेमकी अधिकृत माहिती द्यायला हे ऍप अधिक उपयुक्त ठरेल असे सुभाषबापू या प्रसंगी बोलताना म्हणाले.
या ऍप मध्ये सोलापूरचा इतिहास, शहरातील धार्मिक स्थळे, लगतची धार्मिक ठिकाणे, शहर आणि आसपासच्या भागातली पर्यटन स्थळे यांची सुंदर माहिती दिली आहे. शिवाय शहरातली मोठी महाविद्यालये, विद्यापीठ, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी आणि हॉटेल्स यांचीही माहिती दिलेली आहे.

शहरातील महत्त्वाच्या सोयी आणि कार्यालये यांची माहिती, पत्ते आणि फोन क्रमांकही या ऍपमध्ये दिलेले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सोलापूर बसस्थानकापासून सुटणार्‍या बस गाड्यांचे वेळापत्रकही सादर करण्यात आले आहे. शहरातल्या
या ऍपमध्ये पर्यटन गाईडशिवाय टॅलेंट हा विभाग आहे. कोणत्याही युवकाला किंवा कलाकाराला आपली कला पेश करायची असेल तर त्याला ती संधी देणारा तो विभाग असेल.


विशेष म्हणजे सोलापुरातल्या लोकांना उपयुक्त ठरेल अशी काही संकेतस्थळे आणि लिंक्सही या ऍपमध्ये आहेत. ज्यामुळे सोलापूरकरांना आपला व्यवसाय विकसित करता येईल.
यात सोलापुरातील खाद्य संस्कृतीचेही एक स्वतंत्र दालन आहे. आणि सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची इतिहासापासूनची सविस्तर माहिती आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

6 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

21 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

22 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago