आनंदाची बातमी : उजनी धरण 100 टक्के भरलं

आता जबाबदारी पाणी टिकवण्याची..

0
2315

By-MH13NEWS,network

सोलापूरची जीवनदायिनी म्हणून ओळख असणारं उजनी धरण 100 टक्के भरलं आहे.

एकीकडे सोलापूर जिल्ह्यात अजूनही पावसाने ओढ दिली असल्याने दुष्काळी परिस्थिती आहे .मात्र पुण्यात पडलेल्या पावसामुळे उजनी धरण बुधवारी सकाळी 100 टक्के भरलं आहे. सध्या उजनी धरणातून भीमेत दीड लाख क्सुसेक पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सोलापूरकरांसाठी ही मोठी आनंददायी बातमी आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली उजनी धरणाची बुधवारी सकाळी अकरा वाजताची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. उजनी पाणी भरले: ११६.९९ टीएमसी, टक्केवारी: ९९.५६ टक्के, भीमेत विर्सग: १ लाख ५0 हजार क्सुसेक, वीजनिर्मिती: १६00, अशा प्रकारे नदीत विसर्ग १ लाख ५१ हजार ६00 क्सुसेक. मुख्य कालवा: २५00, बोगदा: १२00, दौंड विर्सग: १ लाख १५ हजार ९१९ क्सुसेक. नीरा प्रणाली धरण विर्सग: भाटगर: १३ हजार ९८0, निरादेवघर: १९ हजार ६५0, गुंजवाणी: ३ सहिर ५४, एकूण वीरधरण विर्सग: ७८ हजार ३२५ क्सुसेक. उजनी व वीरधरणातील विसर्ग कमी झाला आहे.

पंढरपुरात आहे पूर परिस्थिती
आजच्या सकाळी आलेल्या माहितीनुसार माळशिरस तालुक्यातील अकलुज व भीमेकाठच्या पंढरपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील नदीकाठच्या बाधीत कुटुंबांना यापूर्वीच प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.

भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत. माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here