By-(धोंडप्पा नंदे) एमएच१३न्यूज वेब/टीम
सोलापुरातील अक्कलकोट चौपदरी रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे.दळणवळणासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते. मात्र या मार्गावर चौपदरी रस्त्याचे काम करताना अनेक झाडांची कत्तल करण्यात आली.त्यामुळे शहर परिसरातील निसर्गप्रेमी व अक्कलकोट येथील नागरिकांनी या चौपदरी रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करावे अशी मागणी केली आहे.तसेच या संदर्भात सोशल मीडियामधून प्रशासनाला आवाहनही करण्यात आले आहे.
या मार्गावर जवळपास शेकडो वर्षापासून असणारी अनेक मोठमोठी विविध प्रकारची झाडे,वटवृक्ष होती.रस्त्याच्या कामात अडथळा येत असल्यामुळे ती प्रशासनाकडून तोडण्यात आली. या वृक्षांचे पुनर्जीवन करता आले असते. परंतु नीटशी काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे शेकडो वर्षांची झाडे आज नामशेष झाली आहेत. रस्त्यांचा विकास करताना निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे आहे असे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.
नविन होणाऱ्या चौपदरी रस्त्याच्या मधील दुभाजकांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला पुन्हा वृक्षारोपण करावे .त्यामुळे तोडलेली झाडाची पोकळी भरून येईल व निसर्गाचा समतोल टिकून राहील अशी मागणी संबंधित सार्वजनिक बांधकाम व रस्ता विभागाकडे केली आहे.
तीर्थस्थळे असे जुळणार
अक्कलकोट – मैंदर्गी, दुधनी, सिन्नूर मार्गाचे दुपदरीकरण होत आहे. सिन्नूर ते अफजलपूर आणि पुढे कलबुर्गीपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. अफजलपूरनंतर मुख्य मार्गापासून सात किलोमीटरवर गाणगापूर हे तीर्थस्थान आहे. या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोलापूर ते अक्कलकोट आणि गाणगापूर ही दोन तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होत आहेत.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…