Categories: राजकीय

वारं विधानसभेचं : खासदार सुप्रिया सुळे उद्या सोलापुरात

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे शनिवार २४ ऑगस्ट रोजी शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात विद्यार्थी , वकील,डॉक्टर,व्यापारी आणि अभियंत्यांशी सुप्रियाताई संवाद साधणार आहेत.तसेच शहर विधानसभा मतदारसंघातील नेते ,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे- पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.

असा आहे दौरा

खासदार सुप्रियाताई सुळे शनिवारी सकाळी बारामती येथून पंढरपूरकडे प्रयाण करतील. सकाळी सव्वा आठ वाजता पंढरपुरात देवदर्शन करतील. त्यानंतर सकाळी सव्वा नऊ वाजता मोहोळ तालुक्यातील अनगरकडे रवाना होतील. सव्वा दहा वाजता अनगर येथे आगमन झाल्यानंतर सकाळी साडेदहा ते बारा यावेळेत अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील महाविद्यालयातील विध्यार्थ्यांशी त्या संवाद साधतील. दुपारी १२ ते  पावणे एकपर्यंतची वेळ राखीव आहे. त्यानंतर पावणे एक वाजता त्यांचे मोहोळकडे प्रयाण होईल. दुपारी १ ते २ यावेळेत मोहोळ येथे वकील,व्यापारी,डॉक्टर आणि व्यावसायिकांशी सुप्रियाताई सुसंवाद साधतील. दुपारी २ वाजता त्यांचे मोहोळ येथून सोलापूर शहराकडे प्रयाण होईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व जेष्ठ नेते,प्रांतिक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुप्रियाताई मार्गदर्शन करणार आहेत . दुपारी साडेचार वाजता रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

त्यानंतर साडेपाच वाजता डफरीन चौकातील इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृहात सोलापुरातील वकील,व्यापारी,डॉक्टर आणि अभियंत्यांशी खासदार सुप्रियाताई यांचा सुसंवाद साधणार आहेत . त्यानंतर दमाणी नगरातील अंध शाळेला भेट देणार आहेत . त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये विद्यार्थी संवाद होईल.

त्यानंतर खासदार सुप्रियाताई रात्री ८ वाजता जेष्ठ नेते मनोहरपंत  सपाटे यांच्या शरद नागरी सहकारी बँकेला भेट देणार आहेत. या कार्यक्रमानंतर वेळ राखीव असून खासदार सुप्रिया सुळे रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे- पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.

पुरग्रस्तांच्या अडचणी दूर होत असताना आणि एका बाजूस  दुष्काळानं अर्धा महाराष्ट्र करपत असताना विधानसभेचं वारं घुमण्यास सुरुवात झाली आहे.याच पार्श्वभूमीवर नेत्यांच्या गाठीभेटी मुळे दिलासा मिळणार की शहाणा बनतं असलेला मतदार प्रश्नांची आग ओकणार हे लवकरच कळणार असल्याचं दिसून येईल.

शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून उपाधी असलेल्या शरद पवारांच्या कन्या दुष्काळी भागातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा नक्कीच देतील.सत्ता नसली तरी इच्छाशक्ती मुळे सरकार दरबारी आशादायी मागणं मान्य करून घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.…

4 hours ago

धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

MH 13 NEWS Network आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट…

5 hours ago

‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली…

6 hours ago

शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र…

6 hours ago

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई /नागपूर, दि.31 :…

9 hours ago

ग्रामीण भागात होतोय शिरकाव ;बार्शी तालुक्यात रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

MH13NEWS NETWORK सोलापुरातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे. बार्शी तालुक्यात त्याचा…

9 hours ago