पंढरपुरात मंगळवारपासून तीन दिवस संचारबंदी ; ‘कार्तिकी’ वारी साठी नियमावली

पंढपूरमध्ये 22 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपासून 26 नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीचा सोहळा 26 नोव्हेंबर रोजी होत असताना दशमीच्या रात्री बारा वाजेपासून म्हणजेच 25 नोव्हेंबरपासून एकादशीच्या रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजेच 26 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील 5 ते 10 किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रा काळातही आषाढी प्रमाणे संचारबंदी लागू होणार असून 4 दिवस एसटी बससेवा देखील बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासन गंभीर बनले आहे. कार्तिकी काळात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान आज प्रशासनाने वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधीं सोबत चर्चा केली. वारकरी संप्रदाय मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी करीत असला तरी कोरोनाचा वाढत धोका पाहून शासन व प्रशासन यास तयार होईल अशी परिस्थिती नाही. यात्रा काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना कोरोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही सवलत देता येईल का यावर सध्या प्रशासन विचार करीत आहे.

जे भाविक अथवा दिंड्या पंढरपूरच्या वाटेकडे निघाले आहेत त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच या दिंड्या व भाविकांना परत पाठविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत पोहचू नये यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेंगेटिंग केले जाणार आहे.

कार्तिकी वारी साठी जिल्हा प्रशासनाची नियमावली

  • 26 नोव्हेंबरच्या पहाटे शासकीय पूजा व त्याच दिवशी दुपारी पाच मानकर यांच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणा काढण्याची मुभा.
    26 नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे परंपरेनुसार नैवेद्द दर्शन होईल.
  • 30 नोव्हेंबर रोजी मंदिर समितीच्यावतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा व पालखी अत्यंत साध्या पद्धतीने काढण्यात येणार आहे.
  • 1 डिसेंबर रोजी महाद्वार काल्याने यात्रेची सांगता. या कार्यक्रमास सभामंडपात केवळ दहा लोकांना परवानगी देण्यात आली.
  • श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे.
  • 21 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत चंद्रभागेत स्नान करण्यास बंदी.
  • महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश व कर्नाटकातून येणाऱ्या दिंड्यांना बंदी..
  • पंढरपुरातील मठांमध्ये वारकऱ्यांना मुक्काम करण्यास बंदी.
  • श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री पांडुरंग, संत पुंडलिक, संत नामदेव इत्यादी पालखी सोहळा पंढरपुराहून एसटी बसने आळंदीला जातील. प्रत्येक पालखीसोबत वीस लोकांना परवानगी.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

7 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago