Categories: Uncategorized

यंदाच्या वर्षी श्री सिध्देश्वर यात्रेत लेझर शोचे आकर्षण

सोलापूर ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांची यात्रा सोमवार दि. १३ जानेवारी रोजी स. ८ वा. हिरेहब्बू मठातून नंदीध्वजांची मिरवणूकीस सुरुवात होऊन श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगास तैलाभिषेकाने (यण्णीमंजन)  प्रारंभ होणार असल्याची माहिती श्री सिध्देश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

  यावेळी काडादी पुढे म्हणाले की, तैलाभिषेकाच्या दुसर्‍या दिवशी १४ जानेवारी रोजी संमतीकट्यावर अक्षता सोहळा (सम्मतीभोगी) दु. १२.३० वा. संपन्न होणार आहे. १५ जानेवारी रोजी होम मैदानावर होमप्रदीपन-समारंभ (मकरसंक्रांत), १६ जानेवारी रोजी रात्री ८ वा. शोभेचे दारुकाम व लेझर शो होम मैदान येथे होणार आहे. १७ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जनाने (कप्पडकळी) धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल.

या यात्रेत पशु प्रदर्शन व विक्री सालाबादप्रमाणे रेवणसिध्देश्वर मंदिर परिसरात जनावरांचा बाजार भरणार असून यात खिल्लारी जनावरे, जर्सी गायी व म्हशी यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. होम मैदानात श्री सिध्देश्वर देवस्थान यात्रा कमिटी, महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग, महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४९ वे श्री सिध्देश्वर कृषी प्रदर्शन भरविणार असून यात ८० हून अधिक कंपन्यांचा सहभाग असेल.

    यंदा या यात्रेत गृहोपयोगी व विविध वस्तू, हस्तकला, चित्रकला, विणकाम आदि व खाद्यपेयांची जवळपास २२५ च्यावर स्टॉल्स असून यात आनंद मेळावा, आकाश पाळणे, मौत का कुआ, ब्रेक डान्स, पन्नालाल गाढव, क्रॉस व्हिल, मॅजिक शो, सेलंबो, मिनी ड्रॅगन रेल, कटर पिलर, मेरी गो-राऊंड, डॉग-शो, अ‍ॅक्टोबस, नावाडी, एअर इंडिया, कोलंबस, नागकन्या, टोराटोरा, डायनासोर हेे खास आकर्षणे असणार आहेत.

    सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यात्रेत यंदा आवश्यकतेप्रमाणे अंदाजे ४० सी.सी.टीव्ही बसविण्याचे काम सध्या सुरु आहे. या यात्रेत सहभागी होणार्‍या भाविकांचे अपघात विमा मंदिर समितीच्या वतीने उतरविण्यात येणार आहे.

घालणार मिरवणूक मार्गावर रांगोळी

संस्कारभारती व कला फाऊंडेशन

गेल्या २० वर्षापासून ’संस्कारभारती’च्या वतीने श्री सिध्देश्वर यात्रेत नंदीध्वज मिरवणूक मार्गावर नियमित रांगोळी घालण्यात येते. यंदाही १३ व १४ जानेवारी रोजी हिरेहब्बू मठापासून ते संमती कट्ट्यापर्यंत अक्षता सोहळ्याच्या दिवशी संस्कारभारतीचे ४५० ते ५०० कार्यकर्ते रांगोळीच्या पायघड्या घालणार आहेत. तसेच कला फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रातीच्या दिवशी संध्या. ८ वा. नागफणी नंदीध्वजधारक पसारे यांच्या घरापासून ते विजापूर वेशीपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहे.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

11 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

13 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

24 hours ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago