सोलापूरातील ‘या ठिकाणी’ होणार 100 टीमद्वारे सर्वेक्षण ; घरपोच धान्य व वैद्यकीय सेवा – जिल्हाधिकारी

MH13 NEWS NETWORK

सोलापूर, दि.4- कुंभारी येथील गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यासाठी शंभर टीमद्वारे वसाहतीतील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण होणार असून त्याचबरोबर घरपोच धान्य, मेडिकल सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

गोदूताई परुळेकर वसाहत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज झाली. या बैठकीस पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री शंभरकर म्हणाले की, गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीमध्ये 60 हजार नागरिक राहतात. या वसाहतीमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. यासाठी 100 टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीम कडून येत्या दोन दिवसात वसाहतींमधील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल. नागरिकांनी आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक व त्यांचे आजार तसेच आवश्यक माहिती प्रशासनास देऊन सहकार्य करावे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित रहावे. प्रशासनाकडून वसाहतीमध्ये रेशन धान्य, दूध, मेडिकल सेवा आणि दोन ऍम्ब्युलन्सची येथे व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. गोदूताई परुळेकर वसाहतीसाठी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शंभर विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या माध्यमातून येथील नागरिकांना सहकार्य करण्याबरोबरच शासनाच्या सूचना पोहोचविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याकडून सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. सर्वेक्षणास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी माहिती द्यावी. आजार अंगावर काढू नये, लपवून ठेवू नये, असेही त्यांनी आवाहन केले.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago