Action | ‘या’ तीन गुन्हेगारांना लावला मोक्का ; तब्बल ११ वर्षांनंतर केली कारवाई

सराईत गुन्हेगारांना मोक्का लावत सोलापूर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तब्बल ११ वर्षांनी अशी कारवाई झाली आहे.

हे आहेत गुन्हेगार…

मुख्य आरोपी संजय उर्फ लखन गोकुळ परदेशी आणि त्याचे साथीदार सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड, सोनू उर्फ ध्रुव सदाशिव मोरे अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. या तिघांनी सोलापूर शहर आणि परिसरात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, पोलिसांवर हल्ला करणे, बेकायदेशीरपणे घरात घुसणे, अस्तित्व लपविणे, जनतेच्या संपत्तीचे नुकसान करणे, दहशत माजविणे यांसारखी गुन्हेगारी कृत्ये एकट्याने किंवा एकत्र सातत्याने करत होते.

त्याचबरोबर आपल्या टोळीत नवनवीन गुन्हेगार सदस्य घेत होते. त्यामुळे त्यांच्यावर विजापूर नाका पोलिस ठाणे येथे १५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आरोपींना अटकही करण्यात आली होती. यातील टोळी प्रमुख संजय उर्फ लखन गोकुळ परदेशी व त्याचा साथीदार सोनू उर्फ ध्रुव सदाशिव मोरे हे दोघे न्यायालयीन कोठडीत असून सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड हा जामिनावर मुक्त आहे.

आरोपींनी त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली आहेत. त्यांच्या या कृत्यास पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ च्या कलम ३ (१)(ii)३(२),३(४) हे कलम वाढ केले आहे. जामिनावर असलेल्या सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा शोध घेऊन त्याला आणि इतर दोन आरोपींना
मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त बापू बांगर (गुन्हे), पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर (परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, विजापूर नाका पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

आरोपींवर आहेत २९ गुन्हे
यातील आरोपींवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल २९ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांची दखल न्यायलयाने घेतली आहे.

११ वर्षांनंतर झाली कारवाई
सोलापूर शहरात यापूर्वी २००९ साली मोक्का कायद्यांतर्गत ५ आरोपींवर कारवाई झाली होती. यानंतर ११ वर्षांनंतर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

14 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

21 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago