पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या IMA बैठकीत या ‘सूचना’…

सोलापूर, दि. 29- शहरातील सर्व नोंदणीकृत खासगी दवाखाने सुरू ठेवावेत. नागरिकांना रुग्ण सेवा मिळाली पाहिजे. यासाठी खासगी रुग्णालय केवळ सुरू न ठेवता प्रत्यक्ष रुग्णांना सेवा द्या, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केल्या.

सोलापूर शहरातील खासगी दवाखाने सुरू करण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात बैठक झाली. यावेळी पालकमंत्री भरणे हे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपायुक्त बापु बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख डॉ. हरीश रायचूर आणि प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे  डॉ.सुदीप सारडा यांनी आपले म्हणणे मांडले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी डॉक्टरांना वारंवार सूचना देऊन दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सांगितले होते, तरीपण अनेक जणांनी आपले दवाखाने बंदच ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात तक्रारी आल्याचे सांगून पालकमंत्री भरणे म्हणाले की, शहरातील सर्व डॉक्टरांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांना सेवा द्यावी. सर्व हॉस्पिटल्स सुरू ठेवावेत.

पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, शहरातील खाजगी दवाखाने सुरू राहिले तर सिविल हॉस्पिटल वरील ताण कमी होईल आणि कोरोना बाधितांना चांगले उपचार देता येणे शक्य होईल.

यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या समस्या सांगितल्या. या समस्यावर जिल्हा प्रशासनातर्फे तोडगा काढण्यात येईल. डॉक्टरांना पीपीई किट, मास्क, सुरक्षा साहित्य पुरवठा करण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांना सर्व प्रकारचे सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दवाखान्यात सेवा न मिळाल्यास त्यांनी 1800233 5044 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीस डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. मिलिंद शहा, डॉ. आदर्श मेहता आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

10 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

18 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

19 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

20 hours ago

निर्णय झाला | सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू … वाचा सविस्तर

MH13 news Network सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच काही तालुक्यांमध्ये दहा दिवसाची संचार बंदी लागू करणार…

20 hours ago

धक्कादायक | ग्रामीण भागात 107 पॉझिटिव्ह ; 2 जणांचा मृत्यू

MH 13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या…

21 hours ago