MH13NEWS Network
पंढरपूर- योगेश कल्याण गायकवाड या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधील विद्यार्थ्याला उपचारासाठी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटने एकूण ३ लाख बासष्ठ हजार रुपयांची मदत केली. आज समाजात वावरताना सहसा ‘मदत’ नावाचा शब्द फक्त वाचण्यास मिळतो पण याठिकाणी स्वेरीने केलेली मदत पाहून ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ याचाच प्रत्यय येतो आणि याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात होत आहे.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्या-याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावेत’ असे प्रसिद्ध कवी विं.दा. करंदीकरांनी म्हटले आहे त्यालाच साजेशी घटना नुकतीच घडली. त्याचे झाले असे की, योगेश कल्याण गायकवाड मु.पो. परिते (ता.माढा) येथील विद्यार्थ्याने येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये सन २०१८-१९ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी तो उत्तीर्णही झाला. दुसऱ्या वर्षाचे पहिले सत्र संपल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला उपचारानंतर त्याला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले.
पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डॉ. शैलेश कानमिंडे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु केले आहेत. उपचारार्थ भरपूर खर्च येत असल्याची बातमी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्यापर्यंत पोहचली. आपला विद्यार्थी मोठ्या आजाराला बळी पडला असून त्याचे वेळीच उपचार व्हावेत या हेतूने त्याला मदत करण्याचे ठरविले.
संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे आणि त्यांचे सहकारी साक्षात परमेश्वर बनून उभे राहिले. सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांचा शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याचा ठसा सर्वत्र उमटत असतानाच योगेशला स्वेरीकडून दीड लाख रुपयांचा धनादेश तर विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून दोन लाख बारा हजार असे मिळून एकूण एकूण तीन लाख बासष्ट हजार रुपयांची रक्कम योगेशचे वडील कल्याण गायकवाड यांच्याकडे शिवजयंतीसाठी आलेले प्रमुख पाहुणे महाराष्ट्र शासनाच्या गडकोट संवर्धन समितीचे सदस्य व मैत्रेय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमर अडके, महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जाचे) ना. शेखर चरेगांवकर यांच्या हस्ते सुपूर्त केली.
यावेळी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष विजय वाघ, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, डिप्लोमा इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम काकडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रिया झेंडे व विद्यार्थी उपस्थित होते. माणुसकीच्या नात्याने आणि दानशुर व्यक्तींनी जर उपचारार्थ मदत करायची असेल तर योगेशचे वडील कल्याण गायकवाड (मोबा.७५१७२८४८९१) यांच्याशी संपर्क साधवा.
सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…