राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी – धैर्यशील मोहिते पाटील

प्रतिनिधी – मराठा आरक्षण विरोधात अनेक केसेस आजही सर्वोच्च न्यायालयात चालू आहेत . वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात SEBC कोट्यातून प्रवेश विरोधात सर्वोच्च न्यायालयात ७ जुलै २०२० ला सुनावणी होत आहे.

त्याच बरोबर मराठा आरक्षणा विरोधातील मुळ याचिकेवर देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने अधिक तत्परता दाखवण्याची गरज आहे असे भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

SEBC आरक्षण संदर्भातील कुठल्याही केसचा निकाल विरोधात गेल्यास त्याचा मुख्य आरक्षणावर नकारात्मक परिणाम होईल. राज्य शासनाने मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी एकाही नामवंत वकिलाची नियुक्ती केलेली नाही तरी मा.सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू भरभक्कम पणे मांडण्यासाठी राज्यशासनाने सरकारी नामवंत तज्ञ व वरिष्ठ विधिज्ञ वकिलांची नेमणूक करावी अशी मागणी सुद्धा मोहिते पाटील यांनी केली.

हे आरक्षण टिकले पाहीजे ही भुमिका घेऊन त्याअनुषंगाने राज्य शासनाने अतिशय गंभीरपणे भुमिका मांडावी तसेच सर्वोच्च न्यायालयात ७ जुलैला होणा-या सुनावणी साठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळणे आवश्यक आहे.

मराठा आरक्षणामुळे जवळपास १२७ तरुण विद्यार्थी अधिकारी झाले. हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्वांच आहे. हे यश ५० पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं त्यांच आहे.

आपली लढाई अजून थांबलेली नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारची महत्वाची जबाबदारी आहे असे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago