सोलापूर, (प्रतिनिधी)
दोन – तीन दिवसापुर्वीच विजापूर रोडपासुन सोलापूरात जाणारे रोडवर (रेल्वे पुलावर) रस्त्यांच्या दुभाजकावर एक ट्रक जोरात आदळला. त्यामुळे हा दुभाजक तुटला असल्याने येथे ठेवलेल्या दगडांमुळे हा रास्ता अपघाताच्या प्रतीक्षेत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

या तुटलेल्या दुभाजका समोर असून मोठे चार दगड आणून ठेवले आहेत. दुस-या दिवशी अपघातग्रस्त ट्रक क्रेन लावून हटवला गेला, परंतु या खेरीज कोणतीच वाहतूक सुरक्षा व्यवस्था अद्यापही केली गेली नाही. येथे एकही बॅरिगेड्स किंवा वाहतूक पोलीसाची ड्युटी नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत परिस्थिती जैसें थे अशीच आहे. रात्रीच्या वेळी अंधारात एखादा वाहनचालक अथवा जड वाहतूक करणारे वाहन आदळून मोठा अपघात होऊ शकतो, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
कालच म्हणजे गुरुवारी सकाळी ११ वाजता कंटेनर आणि टिपरच्या धडकेत हायमास्ट दिवा तुटला होता. महापालिकेचे यात साडे पाच लाखांचे नुकसान झाले होते. टिपर कोसळला तर कंटेनरचा चक्काचूर झाला होता. अजून तरी या जड वाहतुकीच्या तावडीतून या रस्त्याची व पर्यायाने जनतेची सुटका होईल का? हा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

अपघाताच्या प्रतीक्षेत आहेत का ..?
प्रशासन, आरटीओ विभाग आणि शहर वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी आणखी एखाद्या अपघाताच्या प्रतीक्षेत आहेत का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते विवेक वाले यांनी उपस्थित केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here