कौशल्य सेतू मधील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी

मुंबई : 27 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णय नुसार कौशल्य सेतू मधील व्यवसाय विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.

सन 2018-19 पुर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मार्च 2019 च्या इयत्ता 10 वी चे प्रमाणपत्र परिक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी राज्यातील सर्व शाळांना पत्राद्वारे कळविले आहे.

ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. इ. 10 वी प्रमाणपत्र परिक्षेकरिता ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इ.10 वी च्या परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या माध्यमिक शाळे मार्फत राज्य मंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज करुन नोंदणी करावयाची आहे. सदर विहित नमुना मंडळाच्याwww.mahasscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करुन प्रिंट काढण्यासाठी उपलब्ध आहे.

शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी सदर अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज दिनांक 15 मे 2019 या कालावधीपर्यंत परिपूर्ण व बिनचूक भरावा. सदर अर्जावर विहित जागेवर स्वत:ची सही करावी. तसेच तो ज्या माध्यमिक शाळेतून अंतिमत: माध्यमिक शालांत परिक्षेला प्रविष्ठ झाला आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्रार्चायांची सही व शिक्का घेवून सदर अर्ज संबंधित विभागीय मंडळात जमा करावा. सदर अर्जासोबत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र कौशल्य सेतू अभियान प्रमाणपत्र इत्यादींच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात. वरील अर्ज विभागीय मंडळात जमा करताना त्यासोबत प्रकिया शुल्क 40 रुपये व गुणपत्रिका शुल्क 10 रुपये असे एकूण 50 शुल्क राष्ट्रीयकृत बँकांचा धनाकर्ष किंवा रोखीने विभागीय मंडळात जमा करावा. धनाकर्ष विभागीय सचिव, विभागीय मंडळ यांच्या नावे काढावा. वरील प्रमाणे शाळांनी सदरचे अर्ज 16 मे पर्यंत विभागीय मंडळात जमा करावेत

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

15 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

20 hours ago