पूर्वभागात ‘उगादी पंडुगा’चा आनंदी आनंद

By-MH13NEWS,नेटवर्क

सोलापुरातील पूर्वभागात आंध्र प्रदेशातील प्रथा-परंपरेनुसार सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गुढीपाडवा हा आंध्रातील परंपरेनुसार ‘उगादी पंडुगा’ म्हणून येथे साजरा केला जातो. भल्या पहाटे पासूनच ‘उगादी पंडगा’ची तयारी तेलुगु बांधवांनी केली आहे. भावनाऋषी पेठेतील पंचमुखी हनुमान देवस्थानम् येथे सामूहिक पच्चडी सेवनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तसेच शहरातील असंख्य तेलुगु कुटुंबियांच्या घरासमोर सडासंमार्जन रांगोळी दरवाजास आंब्याच्या पानाचे तोरण बांधून तोरण बांधून सजवलं आहे नवीन वस्त्रे परिधान करून भगव्या ध्वजाचे पूजन तेलगू समाज बांधव करतात .नवीन जावई,सून, नातू आणि नातवंडांना साखरेचे व खोबऱ्याचे हार घालण्याचा हा आनंददायी दिवस आहे. मोठ्या उत्साहात व आनंदात हा शुभ व मंगलमय दिवस साजरा केला जात आहे.

अशी आहे प्रथा-परंपरा
वेद पुराणात सांगितल्याप्रमाणे सोमासुर हा राक्षस ब्रह्मदेवाकडून वेद हा पवित्र ग्रंथ चोरून समुद्रात लपवतो.तेव्हा भगवान विष्णू मत्स्य अवतारात सोमासुराचा विनाश करतात. भगवान विष्णू द्वारे ब्रह्मदेवाकडे वेद सुपूर्द केल्यानंतर आनंदाने सृष्टीची निर्मिती ब्रम्हदेव करतात. याच दिवशी सृष्टीचा उगम दिन म्हणजेच गुढीपाडवा आहे म्हणून तेलगू समाज बांधव ‘उगादी पंडुगा’ साजरा करतात.

आरोग्यदायी ‘पच्चडी’चे महत्त्व

ग्रीष्म ऋतूत कडक उन्हामुळे शरीरातील ऊर्जा व
पाण्याचे प्रमाण कमी होते. पुराण काळापासून ऋषिमुनींनी
रसतर्पण करणारे (पाण्याची पूर्तता करणारे), आयुर्वेदिक
महत्त्व असलेले पेय ‘पच्चडी’चे महत्त्व जाणले. त्याचे महत्त्व
वर्षानुवर्षे लोकांना कळावे यासाठी ‘उगादी पंडुगा’दिनी ‘पच्चडी’
पेयाचे महत्त्व विशद केले. परंपरेनुसार या दिवशी मातीच्या माठात पाणी, चिंच, कैरी, गूळ, कडुनिंबाची फुले, खोबरे, डाळिंब,बडीशेप, इलायची आदी तत्काळ ऊर्जा देणा-या पदार्थांपासून पच्चडी पेय बनविले जाते.

माठाला साखर-खोबरेहार घालून पूजन केले जाते व नातेवाइकांना पेय वाटले जाते.असतो.साखरेचे हार, कडुलिंब व आंब्याच्या पानांनी सजविण्यात आलेल्या माठात बनविलेल्या पच्चडीची व पंचांगाची पूजा केली जाते. मित्रमंडळी व नातेवाइकांना आमंत्रित करून पच्चडीचे सामूहिक सेवन केले जाते. तसेच पुरणपोळी व पिठाचे विविध पदार्थ बनवले जातात.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु,…

8 hours ago

सोलापूर- पुणे हायवेवर विचित्र अपघात : तिघांचा मृत्यू, चौघे जखमी

BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माढा तालुक्‍यातील अरण येथे रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अपघात झाला. या…

9 hours ago

चहावाला पंतप्रधान होतो तर चहापानावर बहिष्कार का? – मुख्यमंत्री ठाकरे. वाचा ठाकरेशैली…

MH13 NEWS Network: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला कोपरखळी मारली. पत्रकार परिषदेतील…

10 hours ago

अजून किती बळी ? मार्केटयार्ड सर्व्हिस रोडवर जड वाहनाचं पार्किंग

BY MH13 NEWS NETWORK :  सोलापूर मार्केट यार्ड मधील सर्व मोठी वाहने रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर 24 तास उभे करत असल्याचे दिसून…

11 hours ago

राजन पाटील यांच्यावर अधिवेशनानंतर येणार नवी जबाबदारी!

MH13 NEWS Network: विधानसभा निवडणुक रणधुमाळीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये…

12 hours ago

पुरुष गट राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा…

BY MH13 NEWS NETWORK : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित वरिष्ठ गट पुरूष आंतर जिल्हा स्पर्धा या दी. १२ ते…

13 hours ago