मुळे हॉस्पिटल होणार 50 बेडचे कोविड केअर हॉस्पिटल – आ. प्रणिती शिंदे

प्रशासन व खाजगी रुग्णालयांमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांची मध्यस्थी

होम मैदान किंवा नॉर्थकोट येथे 500 बेडचे आयसोलेशन युनिट उभारणीचा मानस – आ. प्रणिती शिंदें

सोलापूर : सोलापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता शहरातील हॉस्पिटल देखील कमी पडू लागली आहेत. रोजच्या रोज 30 ते 40 रुग्णांची भर पडत आहे. त्यातच सोलापूर प्रशासन व खासगी हॉस्पिटलस् यांच्यामध्ये मतभेद दिसून येत असल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), सोलापूर व सोलापूर प्रशासन यांना एकत्रित येऊन सोलापूरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाववर योग्य ते नियोजन व उपाययोजना करण्यासाठी बौठक आयोजित केली. त्यानुसार सोलापूर शहरातील विविध नामांकित हॉस्पिटल तसेच डॉक्टर्स यांनी अनुकुल प्रतिसाद दिला व आमदार प्रणिती शिंदे यांंच्यामुळे सोलापूर प्रशासन व खाजगी हॉस्पिटल यांच्यातील तिढा सुटला.सर्वांनी कोरोना महामारीच्या विरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित सहभागी होण्याची तयारी दर्शविली.

या बैठकीत खासगी डॉक्टर्सना येणाऱ्या विविध अडचणी व त्यांचे योगदान याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सोलापूर शहरातील आश्विनी सहकारी रुग्णालय, श्री मार्कंडेय रुग्णालय, यशोधरा रुग्णालय यांनीही कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची पूर्णत: तयारी दर्शविली आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी मनपा आयुक्त व इंडियन मेडीकल असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने सोलापूर शहरामध्ये स्पेशल कोविड केअर हॉस्पिटल उभारणीकरीता चर्चा केली आणि प्रायोगिक तत्वार धनराज गिरजी मुळे हॉस्पिटल, सोलापूर येथे आवश्यक त्या बाबी, साधनसामग्री व सोयी-सुविधांचा आढावा घेऊन 50 बेडस् चे अतिदक्षता विभाग (आयसीयु) असणारे सुसज्ज असे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरु करावे, असे मनपा आयुक्त यांना सुचविले आहे. तसेच होम मैदान किंवा नॉर्थकोट मैदान येथे 500 ते 1000 बेडसचे सर्व सोयी सुविधायुक्त सुसज्ज असे आयसोलेशन युनिट हे राज्य सरकार व सोमपा यांच्या माध्यमातून तात्काळ उभारणी करण्याचे आ. प्रणिती शिंदे यांनी सुचविले आहे. यावेळी मनपा आयुक्त श्री. दिपक तावरे, आयएमए, सोलापूर चे प्रेसिडेंट डॉ. हरिष रायचूर, डॉ. आरकल, डॉ. शिवपूजे, डॉ. घुली, डॉ. परळे व डॉ. कुलकर्णी, नगरसेवक चेतन नरोटे व आदी नामांकित डॉक्टर्स उपस्थित होते.

आ. प्रणिती शिंदे यांचे आवाहन

सोलापूर शहरातील गर्भवती महिलांनी प्रसूती व इतर उपचार व तपासणीसाठी महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्ये करुन घ्यावी.
सोलापूर शहरातील ज्या हॉस्पिटल्सना महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणी करायची आहे व ज्या हॉस्पिटल्सने नोंदणीकरीता अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर व आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago