Categories: Uncategorized

गनिमीकावा झाला सुरू | भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना घातला ‘वेढा’ -वाचा

MH13 News Network

सोलापूर,दि.14 : सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. काल रविवारी  सकल मराठा समाजाच्या वतीने  जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन करण्यात येईल, तसेच घेराव घालून मराठा आरक्षण बाबत विचारणा करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज वतीने अचानकपणे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना त्यांच्याच कार्यालयात गनिमी कावा पद्धतीने घेराव घालून आंदोलन करण्यात आले.अचानक झालेल्या आंदोलनाने खळबळ माजली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला .
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन देण्यात आले.या याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष महेश इंगळे ,शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपला मराठा समाज आरक्षणाला पाठिंबा असून सर्व लढायांमध्ये मराठा समाजाच्या अग्रभागी आपण राहू आणि विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठू अशी ग्वाही दिली.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वामिराव पाटील मध्यवर्ती शिवजयंती उत्सवाचे संस्थापक अमोल राजे भोसले अण्णासाहेब पाटील महामंडळचे संचालक प्रशांत भगरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे प्रहार संघटनेचे विजय माने मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष योगेश पवार यांच्यासह अमोल सुरवसे, भरत राजेगावकर, आकाश गडकरी, प्रथमेश पवार, नितीन शिंदे, वैभव घाडगे, आकाश सूर्यवंशी, राजेश निंबाळकर, कुणाल सूर्यवंशी, वैभव मोरे, मंगेश फुटाणे, कृष्णा माने, शीतल फुटाणे, अक्षय मोरे, शुभम चव्हाण, राजा नवले, पप्पू काळे, ज्ञानेश्वर भोसले, गणेश लांडगे,आकाश शिंदे, महेश निकम, संजय गोंडाळ, रणजीत गोंडाळ, गीत पवार, आकाश शिंदे, शुभम कामनोरकर यांच्यासह शेकडो मराठा समाजातील युवक उपस्थित होते .

या अचानक झालेल्या गनिमीकावा आंदोलनाने सर्वत्र खळबळ माजली असून आंदोलनासंदर्भात मंगळवार दिनांक 15 रोजी सायंकाळी पाच वाजता सर्जेराव जाधव सभागृह येथे मराठा समाज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

16 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

4 days ago