सोलापुरातील चिमुकल्यांसाठी प्रथमच अनोखे ‘Sensory Fair’…

MH13NEWS Network

सोलापुरात प्रथमच पाच ज्ञानेंद्रिय आणि त्यांच्या बद्दल माहिती देणारे मनोरंजनात्मक प्रदर्शन ‘Sensory Fair’ खास २ ते १० वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले आहे. सोलापुरातील असे शिबीर प्रथमच होत असल्याची माहिती शाळेच्या सेक्रेटरी सौ.संगीता सारडा यांनी दिली.

दिनांक २९ फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५पर्यत विवेकानंद पब्लिक स्कुल, जुना पूना नाका, सोलापूर येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे

अनोख्या शिबिराचे हे आहे वेगळेपण …

आपल्या शरीरातील पाच ज्ञानेंद्रियांमुळे आपणास विविध गोष्टींचे आकलन होते, जाणीव होते. जसे
डोळयांमुळे आपण पाहू शकतो, नाकामुळे आपण वास घेऊ शकतो, कानामुळे आपण ऐकू शकतो, त्वचेमुळे
आपणास स्पर्श कळतो आणि जिभेमुळे आपणास चव कळते. या प्रदर्शनात पाच ज्ञानेंद्रिय, त्यांचे महत्व,
ते कसे कार्य करतात, त्यांची निगा कशी राखावी या बद्दल माहिती मनोरंजनात्मक पद्धतीने विध्यार्थ्यांना
देण्यात येणार आहे.

Sensory Fair चे  उदघाटन सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. नवनीत तोष्णीवाल यांच्या हस्ते होणार असून त्यांचे बहुमोल मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.या पत्रकार परिषदेवेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सपना आसावा, सौ. ब्रिन्दा पाटील,सौ. निशा मंत्री, सौ. अंकिता सारडा, सौ. विशाखा चौधरी आणि ओंकार कुलकर्णी हे उपस्थित होते.तरी २ ते १० वयोगटातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि पालकांनी या प्रदर्शनास आवश्य भेट द्यावी असे आवाहन विवेकानंद पब्लिक स्कुल तर्फे करण्यात आले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago