उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या निर्णयामुळे संभाव्य सेना-मनसे वाद टळला!

MH13 NEWS NETWORK :
मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर होते. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कोणत्याही स्थितीत वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेतला होता. यासाठी शर्मिला ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीला मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त हे ही उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी वाडिया रुग्णालय बंद होणार नाही असं आश्वासन दिलं. “तूर्तास राज्य सरकार प्रलंबित अनुदानाचे 46 कोटी रुपये देणार आहे अस अजित पवार यांनी सांगितले. ते स्वतः अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आर्थिक तरतूद करणं त्यांच्याच हातात होतं. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर गोष्टींसाठी 105 कोटी रुपये बाकी आहेत. त्यावरही लवकरच निर्णय होईल”, असं शर्मिला ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितलं.

दरम्यान, वाडियाच्या प्रश्नावर मनसेच्या शर्मिला ठाकरे यांनी वेळोवेळी स्पष्ट भूमिका घेतली आहे. काल आंदोलकांना भेट दिल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या, “मध्यमवर्गीय लोकांसाठी वाडिया रुग्णालय अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही महापालिका आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करत आहोत. महाराष्ट्र सरकार व मुंबई महापालिका यांना पूर्व सूचना न रुग्णालायतील बेड वाढवल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे सदसदविवेक बुद्धीने सरकारने ग्रॅंट द्यायला हवी.”

राज्यात आणि मुंबईत कुणाचंही सरकार असलं तरी रुग्णालयाला मिळणारी ग्रॅंट थांबायला नको. आम्ही रुग्णालय बंद पडू देणार नाही. परिचारिकेंचे पगारही थकले आहेत. रुग्णालयात रुग्ण सेवा ठप्प असल्याची नोटीस लावण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही समजावलंय. कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय बंद होणार नाही, या भूमिकेचा शर्मिला ठाकरे यांनी पुनोरुच्चार केला.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

2 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

3 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

14 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

19 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

23 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

23 hours ago