Categories: राजकीय

‘कोरोना’च्या संकटाला जबाबदार ठाकरे सरकार – आ. विजयकुमार देशमुख

सोलापूरात आ.विजयकुमार देशमुख यांनी महाराष्‍ट्र बचाओ आंदोलनात घेतला सहभाग

हे आंदोलन सर्वसामान्‍य जनतेच्‍या प्रश्‍नांकडे राज्‍य सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी आहे. रस्‍त्‍यावर उतरून, सोशल डिस्‍टसिंग चे उल्‍लंघन करून आम्‍ही आंदोलन करत नसुन प्रतिकात्‍मक पध्‍दतीने हे आंदोलन आम्‍ही करित आहोत. या दोन तीन  महिन्‍यात सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताच्‍या अनेक मागण्‍या आम्‍ही केल्‍या. परंतु सरकारने मागण्‍यांकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीस, नर्सेस, सफाई कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या व ईतर कोरोना योध्‍दयांना विमा संरक्षण कवच मिळावे, शेतक-यांना मदत मिळावी अशा विविध मागण्‍या आम्‍ही सरकारकडे केल्‍या, मात्र सरकार याकडे डोळेझाक करित आहे.परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्‍या ऐवजी वाढतच आहे. ही बाब दुर्देवी आहे. सरकारचे या मागण्‍यांकडे लक्ष वेधावे हाच या आंदोलनामागील हेतु आहे. महाराष्‍ट्रात कोरोनाचा वाढत चाललेल्या परिस्थितीस ठाकरे सरकार जबाबदार असल्‍याची टिका माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांनी केली.

आज राजवाडे चौकातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ‘माझे आंगण माझे रणांगण’ या मोहीमेअंतर्गत महाराष्‍ट्र बचाओ आंदोलनात ते बोलत होते. यावेळी सोशल डिस्‍टसिंग पाळत पाच पदाधिका-यांसमवेत आ.देशमुख यांनी राज्‍य सरकारच्‍या निषेधाचे फलक दाखवत आंदोलन केले. यावेळी नगरसेवक अमर पुदाले,प्रसाद कुलकर्णी,श्रीकांत कोप्पा, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

2 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago