‘तेजस्विनी’चा कुली,रिक्षाचालक, कचरा वेचणाऱ्या महिलांना असा ‘आधार’

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. सोलापुरात विविध सामाजिक संस्था आणि मंडळाच्यावतीने मदतीचे वाटप सुरूच आहे . परंतु अनेक घटक त्यापासून वंचित आहेत.

दरम्यान वंचित असलेले रेल्वे स्टेशन वरील कुली, बूट पॉलिश करणारे लोक, रिक्षाचालक आणि दररोज कचरा वेचून उपजीविका भागविणाऱ्या विविध घटकातील महिला अशा सुमारे १२०० गरजूंना राष्ट्रवादी प्रणित तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्यावतीने वारी लक्ष्मी – विष्णू चाळीमध्ये हे धान्याचे किट वाटप करण्यात आले .समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप कोल्हे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, मंगलाताई कोल्हे आणि जयश्री माने यांनी या वंचितांना गहू ,तांदूळ, साखर, तेल, पीठ,कांदा आणि पापड अशा प्रकारचे धान्याचे कीट देऊन मदतीचा हात दिला.

यावेळी मंगेश डोंगरे ,राहुल काटे, रणजीत कोल्हे, अशोक पाटील, नागेश गायकवाड,सौदागर डोंगरे, हसन जमादार, रफिक देंगनाळकर ,गणेश भोसले,विजयसिंग भदोरिया, आरिफ निकेबान ,अनील शिवपुजे, योगेश पवार ,शंकर आयवळे, महादेव भोसले,युवराज घाडगे, युसुफ शेख आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago